Mimi Chakraborty iPhone: पश्चिम बंगालमधील (West Bengal) जाधवपूर येथील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) लोकसभा खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांना एका विचित्र समस्याला सामोरे जावा लागतंय. मिमी चक्रवर्ती यांच्या आयफोनमधून 7000 फोटो आणि 500 व्हिडिओ गायब झाले आहेत. त्यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलीय. त्यांनी थेट आयफोन कंपनीला ट्विटरवर टॅग करत गमवलेला संपूर्ण डेटा पुन्हा मिळवण्यासाठी कंपनीकडं मदत मागितलीय. तसेच त्यांनी नेटिझन्सना डेटा पुनर्प्राप्त कसा करता येईल? याचीही विचारणा केलीय. त्यांच्या ट्विटवर संपूर्ण भारतातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ट्विटरवर एकीकडे अनेकजण त्यांना काही सल्ला देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर, दुसरीकडं लोकप्रतिनिधीने अशा गोष्टींवर नाराज होणे शोभत नाही, असं बोलून त्यांच्यावर टीका केली जातेय.


मीमी चक्रवर्ती यांनी सप्टेंबर महिन्यात आयफोन 13 खरेदी केला होता. मात्र, त्यांच्या मोबाईलमधून अचानक 7000 फोटो आणि 500 व्हिडिओ गाबय झाले. त्यांनी गायब झालेल्या हा संपूर्ण डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु, त्या अपयशी ठरल्या. त्यानंतर मीमी चक्रवर्तींनी ट्विटरवर आपली व्यथा मांडली. तसेच त्यांनी आपल्या फॉलोअर्सना काय करावं? हे देखील विचारलं. त्यांनी या ट्विटमध्ये आयफोन कंपनीलाही टॅग केलंय. मीमी यांच्या ट्विटवर सध्या कमेंटचा वर्षाव होत आहे. काहीजणांनी त्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केलाय. तर, मीमी यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलीय.  
 
मिमी चक्रवर्ती यांनी बोऱ्हेना शे बोऱ्हेना, गोलपो होलियो शॉट आणि पोस्टो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी 2019 मध्ये राजकारणात प्रवेश केलाय. त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून सार्वत्रिक निवडणुकीत जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्या 17 व्या लोकसभेच्या जाधवपूर मतदारसंघातून खासदार आहेत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




हे देखील वाचा-