मुंबई : ट्विटर हे राजकीय नेत्यांसाठी महत्त्वाचं माध्यम आहे. ट्विटरवर नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक लढाई झाल्याचंही पाहायला मिळतं. मात्र असाच एक किस्सा जम्मू-काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांमध्ये पाहायला मिळाला. याची सोशल मीडियावर सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मेहबुबा मुफ्तींना टॅग करुन ट्वीट केलं. मेहबुबा मुफ्तींनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत यूपीएला मतदान करण्याचं आश्वासन दिलं आहे. तर दुसरीकडे एनडीएलाही त्यांनी आश्वासन दिलं आहे. त्या नेमकं काय करणार आहेत, असा सवाल अब्दुल्ला यांनी विचारला.


या प्रश्नावर मेहबुबा मुफ्तींनी मजेशीर उत्तर दिलं. नाक वाकडं केलेली एक इमोजी टाकत त्यांनी रिप्लाय दिला. ट्वीटमध्ये काहीही न लिहिता ही एमोजी टाकत मेहबुबा मुफ्तींनी हे मजेशीर उत्तर दिलं आणि ट्विटरवर एकच हशा पिकला.


मेहबुबा मुफ्तींच्या या इमोजीने ओमर अब्दुल्ला निरुत्तर झाले. मेहबुबा मुफ्तींचं ट्विटर हँडल चालवणाऱ्याचा सेन्स ऑफ ह्युमर खुप चांगला आहे, असं ते म्हणाले.


दरम्यान, हा इमोजी किस्सा ट्विटरवर चांगलाच गाजला. मेहबुबा मुफ्तींनी एका इमोजीतच उमर अब्दुल्लांना क्लीन बोल्ड केल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली.

आपलं ट्विटर हँडल हे सांगायलाही मेहबुबा मुफ्ती विसरल्या नाहीत. पुन्हा एकदा फेक न्यूज. कौतुकास पात्र असलेल्याचं किमान कौतुक केलंच पाहिजे ओमर, असा टोला मेहबुबा मुफ्तींनी लगावला.