नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या बंडाचं प्रकरण ताजं असतानाच, आता एबीपी न्यूजच्या हाती न्यायालयातील भ्रष्टाचाराचा मोठा दस्तऐवज लागला आहे.
मेडिकल कॉलेजमधील प्रवेशासाठी थेट न्यायमूर्तीच लाचखोरी करतात, त्यासाठी ते ‘कोडवर्ड’चा वापर करतात. सीबीआयने चौकशीदरम्यान भ्रष्ट न्यायाधीशांचं संभाषण रेकॉर्ड केलं होतं. या संभाषणाची माहिती एबीपी न्यूजच्या हाती लागली आहे.
लाच घेण्यासाठी कोडवर्ड
'प्रसाद', 'मंदिर', 'बही', 'गमला' आणि 'सामान' हे कोडवर्ड लाच घेण्यासाठी वापरत असल्याचं सीबीआयच्या रेकॉर्डमधून समोर आलं आहे.
यामध्ये ओदिशाचे निर्वृत्त न्यायमूर्ती आय एम कुद्दुसी आहेत जे सध्य जेलमध्ये आहेत. रेकॉर्डमधील एक आवाज कुद्दुसी यांचा आहे.
अलाहाबाद हायकोर्टाचा विद्यमान दोन जजही संशयाच्या घेऱ्यात
कुद्दूसी यांनी खासगी मेडिकल कॉलेजसना कायदेशीर मदद करण्याचा तसंच सुप्रीम कोर्टातही मनाप्रमाणे निर्णय देण्याचं आश्वासन दिलं होतं.
याप्रकरणात अलाहाबाद हायकोर्टाचे विद्यमान दोन न्यायमूर्तीही सीबीआयच्या रडारवर आहेत. अन्य दोन आवाज आहेत ते विश्वनाथ अग्रवाल आणि प्रसाद एज्युकेशन ट्रस्टचे बी पी यादव यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
कॉलेज मालकांचं सुप्रीम कोर्टात आव्हान
प्रसाद मेडिकल कॉलेज हे त्या 46 महाविद्यालयांपैकी एक आहे, ज्यांच्यावर नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला.
याविरोधात कॉलेजचे मालक बी पी यादव आणि पलाश यादव यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र सीबीआयच्या चौकशीत जे समोर आलं ते धक्कादायक होतं. स्वत:च्या बाजूने निकाल लागण्यासाठी बी पी यादव हे निवृत्त न्यायमूर्ती कुद्दुसी यांच्या संपर्कात होते.
दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
विश्वनाथ- हां मुझे लगता है, किस मंदिर में है ये? दिल्ली के मंदिर में या इलाहाबाद के?
कुद्दूसी- नहीं नहीं अभी किसी मंदिर में तो नहीं है ये.
विश्वनाथ- अगर कोई दिक्कत होती है तो वो खुद कह रहे थे जिसके बारे में उन्होंने कल बात की थी. उन्होंने कहा है सौ लोग देंगे. समीक्षा की अनुमति होगी.
बाकी एक कंपनी के लिए वो ढाई देंगे, तीन आप लेंगे और बाकी 50 आप लोग रखेंगे. वो ऐसा कह रहे थे कि जो भी दो या तीन कंपनियां हों वो कर देंगे.
यादव- ढाई के अंदर करवा दो यार, मेरी क्षमता ढाई तक की ही है, करवा दो. देखो जैसा बोला गया है तुम अभी दो लोगे हमसे. एडमिशन हो जाएगा तो हम एक करोड़ जज को भेज देंगे.
विश्वनाथ (यादव यांच्याशी)- काम की गारंटी सौ नहीं 500% की है, लेकिन सामान पहले देना होगा और वो मुलाकात के लिए मना कर रहे हैं क्योंकि जो सरकार चल रही है, चायवाले की सरकार वो सब देख रही है. यही समस्या है.
विश्वनाथ (कुद्दूसी यांच्याशी)- अब पापा एक बात कह रहे हैं, एक बात वह जो कह रहे हैं कि हमारा कैप्टन जो है, आल ओवर इंडिया, जो भी काम हो, वह करने को तैयार है.