चेन्नई : तामिळनाडूतल्या जलीकट्टूदरम्यान एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कालीमुत्थू असं या मृत तरुण तरुणाचं नाव असून, तो पालामेडूच्या डिंडिगुलचा रहिवासी आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालीमुत्थू हा जलीकट्टूचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उभा होता. पण वेगाने धावत येणाऱ्या वळूच्या तावडीत तो सापडला. यानंतर वळूने त्याला तुडवल्याने यात त्याचा जागीत मृत्यू झाला.


या घटनेनंतर जलीकट्टूच्या सुरक्षेवरुन पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे मदुरई आणि अवनीपुरममध्ये रविवारी जलीकट्टूदरम्यान एकूण 79 खेळाडू जखमी झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये जलीकट्टूवर बंदी घातली होती. पण तरीही राज्य सरकारने त्याविरोधात एक अध्यादेश काढून या पारंपरिक खेळाला मान्यता दिली. पण दुसरीकडे यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तामिळनाडूत ठिकठिकाणी प्रदर्शनं होत आहेत.