नवी दिल्ली : दादरी हत्याकांडामध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. अखलाक यांच्या घरात गोमांसच होतं, अशी माहिती फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आली आहे. कोर्टाच्या आदेशनानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला.

 

मथुरेतील फॉरेन्सिक लॅबने आखलाकच्या घरी गोमांस असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

 

फॉरेन्सिक रिपोर्ट सार्वजनिक करण्यासाठी आरोपींचे नातेवाईक आग्रही होते. त्यासाठी कोर्टाच्या फेऱ्याही घालत होते.

 

दादरी हत्याकांडासंदर्भात आरोपींच्या नातेवाईकांनीच रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने अनेकदा रिपोर्ट सार्वजनिक करण्याची सुनावणी पुढे ढकलली होती. त्यामुळे आरोपींच्या नातेवाईकांची निराशा झाली होती.

 

न्यायाधीशांनी खडसावल्यानंतर पोलिसांनी अखेर फॉरेन्सिक रिपोर्ट कोर्टात सादर केला होतं. त्यानंतर आज रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला.

 

काय आहे प्रकरण?

 

28 सप्टेंबर 2015 रोजी उत्तर प्रदेशातील दादरीमधील बिसहेडा गावात काही जणांनी अखलाक यांच्या घरावर हल्ला केला होता. अखलाक यांच्या घरातील सदस्यांनी गोमांस खाल्ल्याचा जमावाचा दावा होता. या हल्ल्यात अखलाक यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा 22 वर्षांचा मुलगा दानिश गंभीर जखमी झाला होता. अखलाकच्या घरातून मांसही जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणात गावातील अनेक लोकांना ताब्यात घेतलं होतं.

 

घटनेचे संपूर्ण देशात प्रतिसाद

 

या घटनेने संपूर्ण देश हादरला. यावर चौफेर टीका तर झालीच पण अनेक प्रतिष्ठित लोकांनी याविरोधात सरकारकडून मिळालेले पुरस्कारही परत केले होते.