एमसीडी महापालिकेत एकूण 272 वॉर्ड आहेत, मात्र दोन वॉर्डमधील उमेदवारांच्या निधनाने या प्रभागातील निवडणुक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आजच्या मतदान प्रक्रियेत जवळपास 1 कोटी 32 लाख मतदार 2315 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. या निवडणुकांचे निकाल 26 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत.
दरम्यान, या निवडणुक प्रक्रियेसाठी मतदान हे ईव्हीएम मशीनद्वारेच होणार असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त एस.के.श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच एकूण 468 केंद्र अतिसंवेदनशील असल्याचं घोषित केलं आहे.
एमसीडी म्हणजे काय?
एमसीडीची 1958 साली स्थापना झाली. दिल्लीचा 96 टक्के भाग हा एमसीडी अंतर्गत येतो. या सर्व भागाचं 2011 मध्ये तीन भागात विभाजन करण्यात आलं. सध्या उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीसाठी स्वतंत्र महापालिका आहेत.