MBBS seats in India: देशामध्ये NEET 2022 ची तयारी सुरु आहे आणि एमबीबीएस (MBBS Admission) प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांची तयारी देखील जोरात सुरु आहे. मात्र देशात कुठल्या राज्यात एमबीबीएसच्या किती जागा आहेत याबाबत स्पष्टता नव्हती. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत सविस्तर माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि खासदार हीना गावित (Heena Gavit) यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना केंद्रानं एमबीबीएसच्या जागांबाबत माहिती दिली आहे. देशात विविध सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये 91 हजारपेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत.
भारतात एमबीबीएस जागांची एकूण संख्या 91,927 इतकी आहे. यात 48,012 जागा सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये तर 43, 915 खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये आहेत. देशात 322 सरकारी मेडिकल कॉलेजेस आहेत तर खाजगी मेडिकल कॉलेजेसची संख्या 290 इतकी आहे.
दिलेल्या यादीनुसार तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 10,725 जागा आहे तर कर्नाटकमध्ये 10,145 जागा आहेत. महाराष्ट्रात एकूण 9,895 एमबीबीएसच्या जागा आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये 9,053 जागा आहे.
कुठल्या राज्यात एमबीबीएसच्या किती जागा?NEET 2022 – State wise list of MBBS Seats
अंदमान आणि निकोबार: 100 आंध्र प्रदेश: 5,335 अरुणाचल प्रदेश: 50 आसाम: 1,150 बिहार: 2,415 चंडीगड: 150 छत्तीसगड: 1,565 दादरा आणि नगर हवेली: 150 दिल्ली: 1,497 गोवा: 180 गुजरात: 5,700 हरियाणा: 1,660 हिमाचल प्रदेश: 920 जम्मू आणि कश्मीर: 1,147 झारखंड: 930 कर्नाटक: 10,145 केरळ: 4,255 मध्य प्रदेश: 4,080 महाराष्ट्र: 9,895 मणिपूर: 375 मेघालय: 50 मिझोरम: 100 ओडिसा: 2,125 पुद्दुचेरी: 1,630 पंजाब: 1,750 राजस्थान: 4,005 सिक्किम: 150 तामिळनाडु: 10,725 तेलंगाना: 5,040 सीटत्रिपुरा: 225 सीटउत्तर प्रदेश: 9,053 सीटउत्तराखंड: 1,150 सीटपश्चिम बंगाल: 4,225
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI