नवी दिल्ली : भारताची बॉक्सर मेरी कोमनं नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिनं 48 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यान्ग मिचा 5-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह तिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे.
सर्वाधिक पदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर
मेरी कोमला या निर्विवाद विजयानं जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सहावं सुवर्णपदक जिंकण्याची संधी दिली आहे. तिनं आजवरच्या कारकीर्दीत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. तसेच या विजयासह तिने या स्पर्धेत सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे. जागतिक स्पर्धेत सात वेळेस अंतिम सामन्यात पोहोचणारी आणि सर्वाधिक पदक जिंकणारी मेरी कोम पहिली महिला बॉक्सर बनली आहे.
आता अंतिम फेरीत मेरी कोमचा मुकाबला युक्रेनच्या हॅना ओखोटाशी होईल. " मी यापूर्वी किम ह्यान्ग मिला आशियाई स्पर्धेत पराभूत केले होते. म्हणून मी सामन्यासाठी तयार होते. विजय असो किंवा पराजय, प्रत्येक खेळाडू यातून काही ना काही शिकत असतो. हॅनाच्या खेळावर अभ्यास करुन, अंतिम सामन्यात तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न मी करणार आहे." अशी प्रतिक्रिया सामन्यानतंर मेरी कोमने व्यक्त केली.
जागतिक स्पर्धेत मेरी कोमची सुवर्ण कामगिरी
2001 (पेंसिल्वेनिया): रौप्य
2002 (तुर्की): सुवर्ण
2005 (रशिया): सुवर्ण
2006 (दिल्ली): सुवर्ण
2008 (चीन): सुवर्ण
2010 (बार्बाडोस): सुवर्ण
2018 (दिल्ली): अंतिम सामन्यात धडक
जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमची अंतिम सामन्यात धडक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Nov 2018 10:29 AM (IST)
मेरी कोमनं नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिनं 48 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यान्ग मिचा 5-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह तिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -