Mann ki Baat LIVE: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशाला संबोधित करणार आहेत. मन की बातच्या माध्यमातून ते संवाद साधतील.  सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रम होणार आहे. आजच्या मन की बातमध्ये पंतप्रधान काय बोलणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. एप्रिल महिन्याच्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी तंत्रज्ञान, पाण्याचं महत्व सांगितलं होतं.






पंतप्रधानांनी गेल्या मन की बातमध्ये म्हटलं होतं की, तंत्रज्ञानाची ताकद सामान्य लोकांचे जीवन कसे बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या आजूबाजूला अनेक बदल झालेलं पाहायला मिळत आहे. डिजिटल पेमेंटमुळे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. गेल्या काही वर्षांत भीम यूपीआय (BHIM UPI) झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयींचा एक भाग बनला आहे. आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतांश गावांमध्येही लोक UPI द्वारेच व्यवहार करण्यात येत आहेत.'


पाण्याचं महत्व सांगताना त्यांनी म्हटलं होतं की, देशातील बहुतांश भागात उष्णता झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची बचत करण्याची आपली जबाबदारीही तितकीच वाढली आहे. तुम्ही आता जिथे आहात तिथे भरपूर पाणी उपलब्ध असू शकते. पण, पाण्याचा ताण असलेल्या भागात राहणार्‍या करोडो लोकांचाही तुम्हाला विचार करावा लागेल, ज्यांच्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अमृतसारखा आहे. 


'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 89वा भाग


दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणी आणि डीडी चॅनलवर प्रसारित केल्या जाणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा 89वा भाग आहे. प्रसार भारती आपल्या आकाशवाणी नेटवर्कवर हा कार्यक्रम 23 भाषांमध्ये प्रसारित करते. याव्यतिरिक्त प्रसार भारती आपल्या विविध डीडी चॅनल्सवर या कार्यक्रमाच्या व्हिज्युअल आवृत्त्या हिंदी आणि इतर भाषांमध्येही प्रसारित केल्या जातात.


2014 पासून सतत करत आहेत 'मन की बात'


पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर 2014 मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज 84 वी मन की बात आहे. या कार्यक्रमाचं पहिलं प्रसारण 3 ऑक्टोबर 2014 साली झालं होतं. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.