Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh Death) यांचे काल रात्री निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनानंतर माजी केंद्रीय राज्यामंत्री राहिलेल्या सूर्यकांता पाटील यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ग्रामविकास राज्यमंत्री असताना ते पंतप्रधान होते. तेव्हा शेतकऱ्यांना शेततळे देण्याची योजना मी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी त्यांनी कसलाही विचार न करता आणि दोन मिनिटात त्या योजनेला मंजुरी दिली. 1600 कोटी रुपये बजेट असलेल्या मंत्रालयाला त्यांनी 2 लाख 16 कोटी रुपये दिल्याची आठवण सूर्यकांता पाटील यांनी सांगितली.
डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन माझ्यासाठी दु:खद घटना असल्याचे सूर्यकांता पाटील म्हणाल्या. शेततळे योजनेला त्यांनी दोन मिनिटात मुंजरी दिली होती. त्यांचे मारुती 800 गाडीवर खूप प्रेम होते असेही त्या म्हणाल्या. सध्याच्या राजकारणात अशा शभ्य आणि हुशार माणूस होणे नाही अशी प्रतिक्रीया माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी दिली.
मनमोहन सिंह अर्थमंत्री नसते तर आपला देश भिकेला लागला असता
डॉ. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना सूर्यकांता पाटील यांनी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून पाच वर्षे त्यांच्यासोबत काम केलं होते. त्यापूर्वी देखील सूर्यकांता पाटील संसदेत त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी दुख व्यक्त केलं आहे. देशाला वाचवणारे, देशाला सुरक्षित ठेवणारे मनमोहन सिंह आणि नरसिंहराव होते. मनमोहन सिंह अर्थमंत्री नसते तर आपला इथिओपिया झाला असता. देश भिकेला लागला असता असंही सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
मारुती 800 या गाडीवर त्यांचे खूप प्रेम होतं
मी हाउसिंग सोसायटीची चेअरमन असताना ते अर्थमंत्री होते. त्यांनी मला विचारलं मिसेस पाटील तुम्ही मला इतकं मोठं घर दिलं आता फर्निचर कुठून आणू. मला स्पेशल फेव्हर करु नका असं ते बोलले होते असंही सूर्यकांता पाटील म्हणाल्या. ग्राम विकास राज्यमंत्री असताना ते प्रधानमंत्री होते. तेव्हा शेतकऱ्यांना शेततळे देण्याची योजना मी त्यांच्याकडे घेऊन गेले. कसलाही विचार न करता दोन मिनिटात त्या योजनेला त्यांनी मंजुरी दिली. 1600 कोटी रुपये बजेट असलेल्या मंत्रालयाला त्यांनी 2 लाख 16 कोटी रुपये दिले. ही आठवण सूर्यकांता पाटील यांनी सांगितली. त्यांच्याकडे मारुती 800 गाडी होती. त्या गाडीवर त्यांचं खूप प्रेम होतं. पंतप्रधान असताना देखील त्यांची मारुती 800 गाडी संसदेत असायची. सर्व सरकारी गाड्यांसोबत ती गाडी देखील असायची. ते नेहमी त्या गाडीकडे बघायचे. त्या गाडीत येताना मी त्यांना कधी बघितलं नाही. पण गाडीवर त्यांचा विशेष प्रेम होतं ही आठवण सूर्यकांता पाटील यांनी सांगितली.
महत्वाच्या बातम्या: