Dancing in Burqa to Bollywood Song : बुरखा (Burqa) परिधान बॉलिवूड गाण्यांवर (Bollywood Song) डान्स करणं विद्यार्थ्यांना महागात पडलं आहे. या प्रकरणी मुख्यध्यापकांनी चार विद्यार्थ्यांना निलंबित केलं आहे. कर्नाटकातील (Karnataka) मंगळुरू (Mangaluru) येथील सेंट जोसेफ इंजिनिअरींग कॉलेजमध्ये (St Joseph Engineering College) ही घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बुरखा घालून बॉलिवूड गाण्यांवर डान्स केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्याध्यापक म्हणाले, 'हा औपचारिक कार्यक्रमाचा भाग नव्हता. कॉलेज समाजामधील एकोपा बिघडवणाऱ्या उपक्रमांना समर्थन देत नाही.'


व्हायरल व्हिडिओवरून उडाली खळबळ


मंगळुरू येथील सेंट स्टीफन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमादरम्यान 'तेरी फोटो को देखने से यार...' या बॉलिवूड गाण्यावर डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. कारण विद्यार्थ्यांनी डान्स करताना बुरखा परिधान केला होता. इतर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याच्या आरोपावरून त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.






कॉलेजने जारी केलं निवेदन


व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कॉलेजने निवेदनात जारी करत म्हटलं आहे की, बुरखा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विद्यार्थी संघटनेच्या उद्घाटनाच्या वेळी ही घटना घडली. हा डान्स ठरलेल्या कार्यक्रमाचा भाग नव्हता.






बुरखा परिधान करुन विद्यार्थ्यांचा डान्स


दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, स्टेडवर बुरखा घालून डान्स करणारे विद्यार्थी याच कॉलेजमधील विद्यार्थी आहे. कॉलेजने आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं आहे की, 'आम्ही कॉलेजमध्ये अशा कोणत्याही उपक्रमांना समर्थन देत नाही ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल.'