लग्नसोहळ्यात डान्ससाठी बोलावलेल्या ट्रुपमध्ये कुलविंदर ही 22 वर्षीय तरुणी नृत्य करत होती. त्यावेळी सोबत डान्स करण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तिच्यावर गोळी झाडली. छातीत गोळी घुसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. कलम 302 अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे..
पाहा व्हिडिओ :