Man Arrested For Urinating on Female Passenger : एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणारा आरोपी शंकर याला आज दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्य आहेत. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपी शंकर आणि संबंधित महिलेमधील व्हॉट्सअॅप चॅट आता समोर आले आहे. या चॅटच्या आधारे मिश्रा याने दावा केलाय की, संबंधित महिलेने आपल्याला माफ केले असून ती माझ्याविरोधा गुन्हा दाखल करणार नाही. शंकरच्या वकिलाने देखील दावा केला की पीडित महिलेला नुकसानभरपाई म्हणून 15,000 रुपये देण्यात आले होते. परंतु, नंतर पीडितेच्या कुटुंबाने ते परत केले आहेत. 


मद्यधुंद अवस्थेत शंकर मिश्रा याने पीडित महिलेच्या अंगावर लघवी केल्याच्या आरोपानंतर त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुरू झाल्यानंतर शंकर मिश्रा याच्या वडिलांनी आपल्या मुलावरील आरोप 'पूर्णपणे खोटे' असल्याचे म्हटले आहे. मिश्रा यांनी दावा केला आहे की त्यांनी 28 नोव्हेंबरलाच त्या महिलेचे कपडे आणि पिशव्या धुवून 30 नोव्हेंबरला त्या तिच्याकडे पाठवल्या आहेत.


"आरोपी शंकर मिश्रा आणि पीडित महिलेने व्हॉट्सअॅपवर एकमेकांना पाठवलेले मेसेजमधून स्पष्टपणे दिसते की, आरोपीने 28 नोव्हेंबरलाच कपडे आणि पिशव्या स्वच्छ करून घेतल्या आणि 30 नोव्हेंबरला त्या तिला पाठवल्या. त्यानंतर महिलेने तिच्या मेसेजमध्ये कथित कृत्याला स्पष्टपणे माफ केले आणि तक्रार न करण्याचा तिचा इरादा व्यक्त केला. महिलेची तक्रार एअरलाइनने पुरेशी भरपाई देण्याच्या संदर्भात असून ही तक्रार तिने 20 डिसेंबर 2022 रोजी दाखल केली आहे, असा दावा शंकर मिश्रा याच्या वकिलाने केलाय.  


वकिलाने दिलेल्या माहितीनुसार, "माझा क्लायंट शंकर मिश्रा यांनी 28 नोव्हेंबर रोजी पेटीएमद्वारे दोन्ही पक्षांमध्ये मान्य झालेली भरपाई दिली होती. परंतु सुमारे एक महिन्यानंतर म्हणजे 19 डिसेंबर रोजी महिलेच्या मुलीने रक्कम परत केली. केबिन क्रूच्या चौकशी समितीसमोर नोंदवलेल्या जबाबावरून असे दिसून येते की या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत आणि संपूर्ण कथा वृत्तांतावर आधारित आहे. केबिन क्रूने सादर केलेल्या निवेदनात दोन्ही पक्षांमधील वाद मिटल्याची माहिती देण्यात आलीय. माझ्या अशिलाचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून तपास प्रक्रियेत सहकार्य करणार आहे." 


दरम्यान, पीडितेने आपल्या पीडितेने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, 'माझे कपडे, शूज आणि बॅग लघवीने भिजली होती. माझा पासपोर्ट, कागदपत्रे आणि पैसे बॅगेत होते. विमान कर्मचार्‍यांनी त्याला स्पर्श करण्यास नकार दिला, माझी बॅग आणि शूजवर जंतुनाशक फवारले आणि मला बाथरूममध्ये नेले. त्यानंतर मला पायजमा आणि सॉक्सचा एक जोड देण्यात आला. क्रू मेंबर्सनीही आरोपीसोबत चर्चा केली आणि आरोपीला तुमची माफी मागायची असल्याचे सांगितले. परंतु, मी स्पष्टपणे सांगितले की मला त्याच्याशी बोलायचे नाही किंवा त्याचा चेहरा देखील पाहायचा नाही. त्यानंतर  माझ्या इच्छेविरुद्ध क्रूने संशयित आरोपीला माझ्यासमोर आणले आणि आम्हाला समोरासमोर बसवले गेले.  माझ्यासमोर बसल्यानंतर तो रडू लागला. त्यावेळी मी स्तब्ध झाले. तो माझी माफी मागू लागला, तक्रार न करण्याची विनंती करू लागला. मी त्याला सांगितले की त्याची कृती अक्षम्य आहे.  


महत्वाच्या बातम्या


विमानात महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी करणारा शंकर मिश्रा 'असा' सापडला पोलिसांच्या जाळ्यात, जाणून घ्या नेमकं काय घडलं त्या दिवशी