"संसदेच्या अधिवेशनादरम्यान ममता बॅनर्जी जेव्हा दिल्लीत येतात, तेव्हा संसद भवनात अडवाणी यांची भेट घेतात. ही एक सामान्य बैठक होती. या भेटीदरम्यान ममता आणि अडवाणी यांच्यात 15 मिनिटं चर्चा झाली. त्यांच्यात देशातील राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली,"असं अडवाणी यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
तर भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मी अडवाणींना मागील अनेक वर्षांपासून ओळखते. आज त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. एनआरसीची सत्यता पडताळण्यासाठी एक पथक आसामला पाठवावं, अशी विनंती यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांना केल्याचं अडवाणींनी मला सांगितलं.”
याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता विविध पक्षाच्या सहा नेत्यांनाही भेटल्या. यात सपा खासदार जया बच्चन, काँग्रेस खासदार अहमद पटेल, शिवसेना खासदार संजय राऊत, भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि भाजपाचे माजी नेते यशवंत सिन्हा यांचा समावेश आहे. तर ममता आज संध्याकाळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधा यूपीए चेयरमैन सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहेत.