नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर भाजपमध्ये आता मंत्रिमंडळाबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.


नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यात आज बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी मंत्रिमंडळात 20 टक्के बदल करण्यात येणार असून, तरुण खासदारांना मोठी संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


संभाव्य मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश होईल, याची काही नावेही समोर आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि सुरेश प्रभू यांची नावे आघाडीवर आहेत. तर टॉपच्या मंत्र्यांमध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण यांचा समावेश होऊ शकतो.



राज्यनिहाय संभाव्य मंत्री


महाराष्ट्र


नितिन गडकरी,  प्रकाश जावडेकर, सुरेश प्रभू


बिहार


रविशंकर प्रसाद, रामविलास पासवान (LJP), रामनाथ ठाकूर, संतोष कुशवाहा, गिरीराज सिंह, आर के सिंह


झारखंड


जयंत सिन्हा, संजय सेठ


उत्तर प्रदेश


मुख्तार अब्बास नकवी, मनेका गांधी, व्ही के सिंह , सत्यपाल सिंह, संजीव बालयान, रिता बहुगुणा जोशी, एसपीएस बघेल, संजय निषाद, अनुप्रिया पटेल (अपना दल )


पंजाब


सुखबीर बादल


राजस्थान


गजेंद्र सिंह शेखावत किंवा राज्यवर्धन राठोड, पीपी चौधरी, कैलाश मेघवाल


दिल्ली


डॉ. हर्षवर्धन किंवा मनोज तिवारी


मध्य प्रदेश


नरेंद्र सिंह तोमर , थावरचंद गहलोत, प्रल्हाद पटेल


पश्चिम बंगाल


बाबूल सुप्रियो, दिलीप घोष, राहुल सिन्हा


ओडिसा


बसंत पांडा, ज्युएल ओराँव, धर्मेंद्र प्रधान


जम्मू-कश्मीर


डॉ. जितेंद्र सिंह


तेलंगाणा


किशन रेड्डी


अरुणाचल प्रदेश


किरेन रिजिजू


गुजरात


पुरुषोत्तम रुपाला, विनोद चावडा


उत्तराखंड


अनिल बलूनी किंवा अजय टम्टा


कर्नाटक


प्रल्हाद जोशी, तेजस्वी सूर्या