नवी दिल्ली : भाजपचे दिग्गज नेते आणि वाजपेयी सरकारच्या काळातले माजी केद्रीय राज्यमंत्री संघप्रिय गौतम यांनी पक्षाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. गौतम म्हणाले की, "केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करा आणि भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बदलण्याची गरज असल्यामुळे पक्षाची धुरा शिवराजसिंह चौहानांकडे सोपवा."
संघप्रिय गौतम एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पक्षातील इतर नेत्यांची कामे आणि पदांमध्ये बदल करण्याचे सुचवले आहे. गौतम म्हणाले की, "नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांत मोठे नेते आहेत. परंतु 2014 प्रमाणे यावेळी त्यांच्या नावाची लाट नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे मान्य आहे. मात्र ते बोलू शकत नाहीत".
गौतम म्हणाले की, "देशातील जनतेच्या मनात भाजप सरकारच्या धोरणांविरोधात राग पसरला आहे. सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. त्यामुळे जर आत्ता निवडणुका झाल्या तर काही ठराविक राज्य वगळता सर्व राज्यातून भाजपला सत्ता गमवावी लागेल". तसेच "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या पदावरुन हटवून धार्मिक कार्यासाठी पाठवायला हवे", असा सल्लादेखील त्यांनी दिला
वाचा : अनुसूचित जातींमधील 3 लाख लोकांच्या घरुन आणलेल्या तांदळाची भाजप नेत्यांकडून खिचडी
गडकरींना उपपंतप्रधान करा, शिवराज सिंहांना भाजपाध्यक्ष!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jan 2019 12:19 PM (IST)
भाजपचे दिग्गज नेते आणि वाजपेयी सरकारच्या काळातले माजी केद्रीय राज्यमंत्री संघप्रिय गौतम यांनी पक्षाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -