नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडीओ वायरल केले गेल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे आज व्हॉट्सअॅपकडून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. पोस्ट फेक आहे, हे कसे ओळखायचे याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे. यासोबतच आनंद पसरवा, अफवा नाही, असा संदेशही या जहिरातीतून देण्यात आला आहे.
भारतात एकूण 20 कोटी व्हॉट्सअॅप वापरकर्ते आहेत. त्यासोबतच पोस्टची सत्यता न पडताळता पोस्ट वायरल करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. व्हॉट्सअॅपच्या फेक पोस्टमुळे जातीय दंगली सारख्या घटना घडल्या आहेत. नुकतेच गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा पसरल्याने देखील खळबळ उडाली होती. म्हणून अशा फेक पोस्टवर आळा घालने गरजेचे असल्याने व्हॉट्सअॅपने हे पाऊल उचलले आहे. काही दिवसापूर्वीच व्हॉट्सअॅपने फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठीचा नवीन फीचर देखीन अपडेट केला आहे.
फेक बातम्या ओळखण्याचे आवाहन
व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठी पोस्टवरील उजव्या बाजूला एक चिन्ह देण्यात आले आहे. ते चिन्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे बातमी खरी आहे की खोटी, हे ओळखण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, ज्या संदेशाचे मुळ स्त्रोत माहित नसते, ज्यांचा पुरावा नसतो, असे फॉरवर्डेड मेसेजेस ज्यामुळे तुम्हाला संताप येतो, असे फोटो, व्हिडीओ, एवढेच नाही तर व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा एडिट करुन तुमची दिशाभूल केली जाऊ शकते, असे जाहिरातीत म्हटले आहे.
इतर स्त्रोतांकडून तपासून घ्या
सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा आणि बातम्यांच्या विश्वसनीय साईट्सवरुन ही बातमी कुठून आली आहे, याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट्स, विश्वासपात्र व्यक्ती किंवा लीडर्सकडून अधिक माहिती मिळवा, असे यात म्हटले आहे.
अफवांचा प्रसार थांबविण्यासाठी मदत करा
जर, तुम्हाला वाटत असेल की एखादी बातमी फेक आहे, तर लोकांना सांगा की शेअर करण्यापूर्वी ती तपासून पहा भले तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी त्यांनी शेअर करण्याची विनंती केली आहे म्हणून उगीचच शेअर करु नका, असेही जाहिरातीत सांगितले आहे.
आनंद पसरवा, अफवा नाही, व्हॉट्सअॅपकडून वर्तमानपत्रात जाहिरात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2018 04:14 PM (IST)
व्हाट्सअॅपकडून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. पोस्ट फेक आहे, हे कसे ओळखायचे याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे. यासोबतच आनंद पसरवा, अफवा नाही, असा संदेशही या जहिरातीतून देण्यात आला आहे.
पेमेंट फीचर पाहण्यासाठी तुम्हाला अटॅचमेंट ऑप्शनमध्ये जावं लागेल, जिथे ऑडिओ, कॉन्टॅक्ट, व्हिडीओ असे ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत. पेमेंटवर क्लिक करताच तुम्ही यूपीआय पेजशी जोडले जाल. तुमचं यूपीआय अकाऊंट नसेल तर ते तुम्ही यूपीआय अॅप किंवा बँकेच्या अॅपवर जाऊन तयार करु शकता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -