जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी गुरुवारी भारतीय जवानांवर हल्ला केला, या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अजून एक दहशतवादी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीमधील नौशेरा येथे दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात मेजर चित्रेश बिश्त शहीद झाले. चित्रेश यांच्यासोबत एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीसुद्धा अद्याप दहशतवादी कारवाया सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट केला. या स्फोटात एक अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.
दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपासून 1.5 किमी अंतरावर आयईडी ठेवला होता. याची माहिती जवानांना मिळाली. जवानांकडून आयईडी निकामी करण्याचे काम सुरु असताना त्याचा स्फोट झाला.
असा रचला पुलवामा हल्ल्याचा कट, काश्मीरच्या खोऱ्यातून स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा