ओव्हरटेक करताना अपघात, तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2018 03:04 PM (IST)
दुचाकीवरील तीनही तरुण जोरदार धडकेमुळे फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही इंजिनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
बेळगाव : ओव्हरटेक करताना झालेल्या भीषण अपघतात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकीवरुन इंजिनियरिंग कॉलेजचे तीन विद्यार्थी खानापूरकडे निघाले होते. प्रभुनगर जवळ वाहनाला ओव्हरटेक करताना हा भीषण अपघात घडला. दुचाकीवरील तीनही तरुण जोरदार धडकेमुळे फेकले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही इंजिनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे तीनही तरुण पंचवीस फूट दूर फेकले गेले. त्यामुळे जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीझाली होती. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.