नवी दिल्ली: केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन 2 वर्ष पूर्ण होत आहेत. निवडणुकीदरम्यान भारतीय जनतेला दाखवलेल्या 'अच्छे दिन'चं स्वप्न, परदेशातला काळा पैसा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सर्व प्रकरणात नरेंद्र मोदी सरकारने आश्वासक कामगिरी केली का???

 

केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाच्या खात्यांचा पदभार सांभाळणाऱ्या मराठी शिलेदारांनी दोन वर्षात महाराष्ट्रासाठी काय केलं? या सर्व प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझाने, 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

 

आज सकाळी 10 वाजल्यापासून थेट दिल्लीतून या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहता येईल.

 

या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर हे आपलं व्हिजन मांडतील.

 

महाराष्ट्राच्या प्रगतीबाबतचं केंद्रीय मंत्र्यांचं व्हिजन आणि नियोजन काय, हे 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळेल.