मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा या ख्यातनाम कंपनीकडून त्यांच्या अनेक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक असणाऱ्या ‘थार’ (Thar) या अतिशय गाजलेल्या आणि ऑफरो़डिंगसाठी कमालीची पसंती मिळालेल्या एसयूव्हीचे तब्बल 1577 मॉडेल परत मागवण्यात आले आहेत.


कंपनीकडूनच याबाबतची माहिती देत ‘थार’ (Thar)चे डिझेल व्हॅरिएंट परत मागवण्या आल्याचं सांगण्यात आलं. 2020 म्हणजेच मागील वर्षी सप्टेंबर 7 ते डिसेंबर 25 या काळात निर्धारित कालावधीत आणि मर्यादित प्रमाणात तयार करण्यात आलेल्या 1577 युनिट निरिक्षण आणि camshaft बदली करण्यासाठी कंपनीकून परत मागवण्यात आल्या आहेत.


थारच्या डिझेल व्हॅरिएंट युनिटमधील कॅमशाफ्टमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या. कॅमशाफ्ट हा असा भाग आहे, ज्यामुळं इंजिन सुरळीत काम करत राहतं. त्यामुळं या त्रुटीकडे दुर्लक्ष करून चालणारं नाही. याच कारणास्तव हे युनिट परत मागवण्यात आले आहेत.


सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांमध्ये वरील नमूद केलेल्या दिवसांदरम्यान तयार करण्यात आलेल्या युनिटपैकी काहींमध्ये सप्ल्यायर प्लांटमध्ये बिघा़ड आढळून आला. त्यामुळंच कंपनीकडून हे महत्त्वाचं पाऊल उचलत ठराविक युनिट परत मागवण्यात आले आहेत. जिथं त्यांचं परिक्षण केलं जाणार आहे.


लक्षवेधी पोस्ट लिहित लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्याचा सोशल मीडियाला रामराम


मुख्य म्हणजे कंपनीक़डून त्या सर्व ग्राहकांशी संपर्कही साधण्यात येत आहे. शिवाय कारच्या दुरुस्तीसाठी लागणारा सर्व खर्च हा कंपनीकडूनच करण्यात येणार आहे. दरम्यान, 2021 च्या सुरुवातीलाच महिंद्रा अँड महिंद्राकडून त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 1.9 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात आलं.