नवी दिल्लीकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार UPSC चेअरपर्सन मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आहे.  द हिंदू वृत्ताने सोनी यांच्या राजीनाम्याचे वृत्त दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात बनावटगिरी करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरच्या कारनाम्यावरून युपीएससीवर देशभरातून सडकून टीका होत आहे. दररोज बनवाबनवी समोर येत असतानाच सोनी यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. 


राजीनाम्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही


मनोज सोनी यांचा कार्यकाळ 2029 मध्ये संपणार होता. मात्र पाच वर्षांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला. ते 2017 मध्ये लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले. 16 मे 2023 रोजी त्यांनी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरचा वाद चर्चेत असतानाच हा राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनाम्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.


‘द हिंदू’च्या वृत्तानुसार, मनोज सोनी यांनी महिनाभरापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या राजीनाम्याचा UPSC उमेदवार पूजा खेडकरने नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याच्या वादाशी काहीही संबंध नाही, असेही सूत्राने स्पष्ट केलं आहे. मनोज सोनी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केल्याचे समजते. मात्र, सरकारने अद्याप नवीन अध्यक्षांचे नाव जाहीर केलेले नाही.


कोण आहे मनोज सोनी?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सोनी यांना आता आपला अधिक वेळ गुजरातमधील स्वामिनारायण पंथाची शाखा अनुपम मिशनला घालवायचा आहे. 2020 मध्ये दीक्षा घेतल्यानंतर ते अनुपम मिशनमध्ये साधू किंवा निष्काम कर्मयोगी बनले. मनोज सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात. 2005 मध्ये, जेव्हा ते 40 वर्षांचे होते, तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांना वडोदरा येथील प्रसिद्ध एमएस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले. अशा प्रकारे ते देशातील सर्वात तरुण कुलगुरू बनले.


पूजा खेडकर वादाचे कनेक्शन?


जून 2017 मध्ये UPSC मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी, मनोज सोनी यांनी त्यांच्या गृहराज्य गुजरातमधील दोन विद्यापीठांमध्ये तीनदा कुलगुरू म्हणून काम केले होते. सोनी यांनी 2015 पर्यंत दोनदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादाशी मनोज सोनी यांच्या राजीनाम्याचा काहीही संबंध नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या