मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
राज ठाकरेंची आज ठाण्यात सभा
राज ठाकरेंची गुढीपाडव्याला सभा झाली आणि त्यांचे परिणाम अजूनही जाणवत आहे. त्यातच आता आज ठाण्यात मनसेचे लगेचच दुसरी जंगी सभा पार पडत आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यामुळें आता या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलू शकतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
नील सोमय्या यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी
आयएनएस विक्रांत बचाव या मोहिमेसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे.
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मजूर प्रकरणी दरेकर यांचा जामीन अर्ज यापूर्वी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. परंतु अटकेपासून दिलासा दिला होता. आता त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जातो की त्यांना तुरुंगवास होतो? हे आज सुनावणीत कळणार आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये महाविकासआघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे अमेदवार सत्यजीत कदम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्षश्र चंद्रकात पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आणि महाविकासआघआडीचे डझनभर मंत्र्यांनी सभा घेतल्या होत्या. कोल्हापूरशिवाय पश्चिम बंगालच्या बालीगंज, छत्तीसगडमधील खैरागड, बिहारच्या बोचहा येथे मतदान होणार आहे.
चैत्र शुद्ध एकादशी अर्थात अंतःकरणातील सर्व मनोकामना पूर्ण करणारी कामदा एकादशी
मराठी नववर्षात येणारी वारकरी संप्रदायातील पहिली यात्रा म्हणजे चैत्री यात्रा होय. तसे मराठी जणांचा चैत्र महिना हा जत्रा आणि यात्रांचा महिना अशी ओळख असते. या महिन्यात गावोगावी यात्रा आणि जत्रा भारत असतात. या यात्रेची दुसरी ओळख म्हणजे चैत्र यात्रेमधून हरी हरा भेद नाही, हा संदेश वारकरी संप्रदाय जगाला देत असतो. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ही वारी मोठ्या देवाची अर्थात महादेवाची असते. शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या विवाहातील महत्वाचा दिवस चैत्र शुद्ध एकादशीला असतो.
पश्चिम बंगालच्या आसनसोलच्या मतदारसंघातील लोकसभेच्या पदासाठी मतदान
पश्चिम बंगालच्या आसनसोलच्या मतदारसंघातील लोकसभेच्या पदासाठी मतदान होणार आहे. माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेसाठी मतदान होणार आहे.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी मुंबईत
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी मुंबईत पश्चिम विभागातील 6 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या विभागीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. कुपोषणाच्या समस्येचे उच्चाटन आणि महिला आणि बालकांचा विकास, सक्षमीकरण आणि संरक्षणाच्या मुद्यांवर उपाययोजनांबाबत या परिषदेत विचारमंथन होणार आहे.
मुंबईत ग्लोबल स्टेनलेस-स्टील एक्स्पो
मुंबईत आज पहिल्यांदाच ग्लोबल स्टेनलेस-स्टील एक्सपो (जीएसएसई) 2022' चे आयोजन करण्यात आले आहे
सुप्रीम कोर्टातील सुनावणी
सुप्रीम कोर्टात आज अंडरवर्ल्ड सरगना अबू सलेमच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे
आतातरी चेन्नई विजयाचं खातं उघडणार का?
यंदा नव्या कर्णधारासाह मैदानात उतरणाऱ्या चेन्नई संघाची सुरुवात खराब झाली आहे. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात चौन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी चैन्नई यंदाच्या हंगामातील पाचवा सामना खेळणार आहे. या सामन्यात तरी चन्नई विजयाचं खाते उघडणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागले आहे. चेन्नईच्या किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्सबरोबर होणार आहे. चेन्नईचा माजी खेळाडू यंदा त्यांच्याविरोधात उभा आहे. कधीकाळी चेन्नईच्या फलंदाजांची कमान सांभाळणारा फाफ डु प्लेसिस यंदा चेन्नईच्याच विरोधात उभा आहे. फाफ यंदा आरसीबीचं नेतृत्व करत आहे. आरसीबीही आपली विजयी लय काम राखण्यासाठी मैदानात उतरत आहे. त्यामुळे मंगळवारी होणारा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. ही मॅच संध्याकाळी नवी मुंबईत 7.30 वाजता सुरू होणार आहे.
भारतीय युवा महिला संघ 9 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल
भारतीय युवा महिला संघ 9 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. तसेच वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित करणारा भारत हा पहिला महिला युवा संघ ठरला.
आजपासून पहिली 'खेलो इंडिया राष्ट्रीय रॅंकिंग महिला तिरंदाजी स्पर्धा'
आजपासून पहिली 'खेलो इंडिया राष्ट्रीय रॅंकिंग महिला तिरंदाजी स्पर्धा' जमशेदपूरमध्ये होत आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने शहरातील टाटा तिरंदाजी अकॅडमीमध्ये आज होणार आहेत. ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहे. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर मान उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे
रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि बेलारुसचे राष्ट्रपती लुकाशेंको यांची भेट
रशिया- युक्रेन युद्धाचा उद्या 48 वा दिवस आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन आणि बेलारुसचे राष्ट्रपती लुकाशेंको वोस्तोचन कोस्मोड्रोम येथे भेट घेणार आहे. दोन्ही राष्ट्रपती पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे
आज इतिहासात
1978- भारातातील पहिली डबल रेल्वे मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनलवरून पुण्याला रवाना झाली होती
1885 - मोहेंजदडोचा शोध लावणारे प्रसिद्ध इतिहासकर राखलदास बनर्जी यांचा जन्म
1945 : अमेरिकेचे राष्ट्रपती फ्रँकलीन रूजवेल्ट यांचा गूढ मृत्यू
1955 - डॉक्टर जोनास साल्क यांनी पोलिओचे औषध शोधल्याचा दावा केला.
2007 - पाकिस्तानने पहिल्यांदा ईरान गॅस पाईपलाईसाठी भारताल मंजूरी दिली
2020- देशात कोरोना व्हायरसच्या नऊ हजार रुग्णांची नोंद झाली आहे