- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Live Blog Updates: कित्येक पिढ्यांचे घाव आज भरलेत, कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक म्हणजे धर्मध्वज : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार आहेत. देशातील सामाजिक-सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे. सकाळी 10...More
परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद तर ताडकळस मध्ये चिमुकले उतरले रस्त्यावर
मालेगावच्या डोंगराळे गावतील घटनेचा निषेध करत केली कारवाईची मागणी
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मूलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीचे सोनपेठ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले तसेच पूर्णा तालुक्यातील ताडकळस शहरात आज चिमुकल्या शाळकरी मुलांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेवून रस्त्यावर उतरत मोर्चा काढला आणि या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Anchor:-अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतिक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ११. ५५ मिनिटांनी अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकवताच ठाण्यातील मंदिरांमध्ये तसेच काही घराघरात घंटानाद करण्यात आला. हा घंटानाद ११. ५५ ते १२. १० असा २० मिनिटे सुरु होता.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत भगवा धर्मध्वज फडकवला. या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनीदेश-विदेशातील रामभक्तांना मंदिर पूर्णत्वाचा संदेश दिला. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होता यावे यासाठी ध्वज फडकताच देशभरातील अनेक मठ-मंदिरांमध्ये आणि सनातनी घरांमध्ये घंटानाद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्यावतीने ठाण्यातील मंदिर, मठ व्यवस्थापकांना तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले होते की मोदी यांच्या हस्ते आयोध्येतील श्रीराम मंदिरावर भगवा ध्वज फडकताच घराघरात तसेच मंदिरांमध्ये घंटानाद करण्यात यावे. या आवाहनाला प्रतिसाद देत ठाण्यातील मंदिर, मठ तसेच काही घराघरांमध्ये घंटानाद होताना दिसून आले. ठाण्यातील घंटाळी परिसरात असलेल्या प्राचीन आणि ऐतिहासिक घंटाळी मंदिरात घंटानाद करण्यात आला. यावेळी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य, घंटाळी मंदिराचे व्यवस्थापक सदस्य आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
असा आहे भगवा ध्वज...
या विशेष भगव्या ध्वजावर सूर्यवंशाची प्रतीक चिन्हे आहेत. श्रीराम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे. या स्तंभावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंद असा हा भगवा-केशरी ध्वज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते फडकविण्यात आला आहे. हा ध्वज सुमारे ४ किलोमीटर दूरूनही दिसणार आहे. त्यासाठी राम मंदिरात ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम बसवण्यात आली आहे. भविष्यात ध्वज बदलण्यासाठीही हीच सिस्टम वापरली जाईल. वारा जोरात वाहिल्यास ध्वज ३६० डिग्री फिरू शकतो अशी व्यवस्था आहे
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातील युतीच्या प्रश्नावरून रवींद्र चव्हाण यांची सारवासारव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली अशा पद्धतीचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला होता. मात्र या प्रश्नाला बगल देत रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देण्याच टाळलं. हा प्रश्न तुम्ही ट्विस्ट करून विचारत आहात. त्यामुळे नेमका व्हिडिओ काय आहे तो पहा ? असं सांगत त्याने उत्तर देण्याच टाळलं.
अमरावती
नवनीत राणा म्हणाल्या मी पुन्हा येईल
मुख्यमंत्री यांना सांगतांना म्हणाल्या की, दादा आता मलाही म्हणायची वेळ आली आहे की मी पुन्हा येईल..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच नवनीत राणा यांनी व्यक्त केली पुन्हा खासदार होण्याची इच्छा
बेटी को बेटी को लाना है वापस की नही लाना है.. दादा पराभव झाल्यानंतरही आम्ही खूप कष्ट करून इथपर्यंत प्रचारासाठी आलो..
देवेंद्र भाऊ देवा भाऊ म्हणून तुम्ही महिलांच्या पाठीशी आहे.. त्यांच्या डोक्यावर तुमचा हात आहे..
आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांचा दुजोरा.
बुलढाणा फ्लॅश
पिक विमा साठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी अधिकाऱ्याला घेराव.
मलकापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते कृषी कार्यालयात दाखल
2023 व 24 वर्षातील पिक विम्याची रक्कम अध्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही त्यामुळे मलकापूर तालुक्यातील हजारो शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहेत सातत्याने कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊनही कुठल्या प्रकारचा पिक विम्याची रक्कम आतापर्यंत मिळाली नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात येऊन अधिकाऱ्याला घेराव घातला व पिक विम्याची रक्कम तात्काळ.देण्यात यावी अशी मागणी केली. जर येत्या पंधरा दिवसात पिक विम्याची रक्कम खात्यात जमा झाली नाही तर शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला
Amravati: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण
तुमच्या आशीर्वादाने नवनित राणा आता माजी खासदार राहणार नाही
महाराष्ट्राचे प्रवेश द्वार असलेल्या धारणीत मी आलो आहे..
मी म्हटले की मला धारणीत सभा करायची आहे..
मी धारणी मधून सर्व अमरावती जिल्ह्याला सांगायला आलो की भाजपला निवडणूक द्या...
या लोकांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे...
धारणी मधील 52 कोटी ची योजना असेल किंवा चिखलदरा मध्ये 55 कोटीची पाण्याची योजना मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारने दिली...
घराघरात आम्ही पाणी पोहचवणार आहे..
प्रत्येक शहारात आम्ही बंद गटार लाईन टाकणार आहे...ते पाणी नदीत जाणार नाही.. त्यावर आम्ही प्रक्रिया करू..
असे लोक निवडायांचे आहे ते आपल्या अजेंड्यावर काम करेल..मोदी यांच्या अजेंड्यावर काम करेल...
1300 आजार साठी आधी उपचार होत होते आता 2400 आजार वर उपचार 5 लाख मधे केले जाणार.हा खर्च भाजप सरकार करेल
धारणी मधील 50 बेड चे उपजिल्हा रुग्णालय आता 100 बेड चे करण्याचा आम्ही निर्णय केला आहे
रत्याचे काम मेळघाट मध्ये केले जात आहे...
मेळघाट मधील धारणी आणि चिखलदरा मधील अतिक्रमण धारकाना पट्टे वाटप केले जाणार आहे.
लोक वेगवेगळे आश्वासन देत असतात आम्ही आश्वासन पूर्ण करत असतो
विरोधक आरोप करत होते की लाडकी बहीण होणार पण आम्ही बंद केली नाही..जो पर्यत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तो पर्यत लाडकी बहीणचे पैसे येत राहणार आहे..
आम्ही एकदा येऊन पळून जाणारे लोक नाहींअहे
धारणी मधील 50 बेड चे उपजिल्हा रुग्णालय आता 100 बेड चे करण्याचा आम्ही निर्णय केला आहे
रत्याचे काम मेळघाट मध्ये केले जात आहे...
मेळघाट मधील धारणी आणि चिखलदरा मधील अतिक्रमण धारकाना पट्टे वाटप केले जाणार आहे.
लोक वेगवेगळे आश्वासन देत असतात आम्ही आश्वासन पूर्ण करत असतो
विरोधक आरोप करत होते की लाडकी बहीण होणार पण आम्ही बंद केली नाही..जो पर्यत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तो पर्यत लाडकी बहीणचे पैसे येत राहणार आहे..
आम्ही एकदा येऊन पळून जाणारे लोक नाहींअहे
आम्ही चिखलदरा ला आकर्षक बनवणार आहे..मागे सरकार नव्हतं तर कामे बंद पडले होते...
महाबळेश्वरच्या धर्तीवर चिखलदराला आम्ही बनवणार आहे......
स्कायवॉकचे काम पूर्ण केले जाणार आहे
75 वर्षात आदिवासीचा विचार कुठल्याच पक्षाने केला नाही...
चिखलदरा मध्ये आम्ही एक चांगली मिल्ट्री स्कुल चालू करू
अमरावती जिल्ह्यात 100 टक्के उमेदवार कमळाचे निवडुन आना
रेल्वेचे अधिकारी त्यांच्या जबाबदारीवर धरून काम करीत नाहीत, मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रत्यक्ष रेल्वे स्थानकात, ट्रैक वर उतरून काम करत नाहीत, खासदारांना माहिती देत नाहीत, मात्र जनता रेल्वेच्या समस्यांबाबत खासदारांना दोषी ठरवते, याबाबत रेल्वे मंत्र्यांसमोर नाराजी केली व्यक्त
या कमिटीचे अध्यक्ष स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत झाली बैठक
ट्रेन मध्ये शौचालय चांगले नसतात, आतमधल्या सुविधा वाईट असतात रेल्वेच्या प्रवाशांना प्रचंड असुविधेला सामोरे जावे लागते अश्या अनेक समस्या महारात्रातील खासदारांनी मांडल्या
यात शिवसेनेचे नरेश म्हस्के, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांनी मांडल्या समस्या
सत्यातूनच धर्माची स्थापना
आज संपूर्ण जग राममय झालाय. तमाम देशवासियांना शुभेच्छा.
कित्येक पिढ्यांचे घाव आज भरलेत, कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक म्हणजे धर्मध्वज
आम्ही राहू किंवा न राहू देश कायम राहणार आहे.
सत्याचा कायम विजय होतो, असत्याचा नाही.
प्रत्येकाने राम मंदिराच्या दर्शनाला यावं, पंतप्रधान मोदींचे आवाहन
Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremony: उत्तर प्रदेशमधील अयोध्येत राम मंदिराच्या शिखरावर (Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Ceremon) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर औपचारिकरित्या भगवा ध्वज फडकावला, जो मंदिराच्या बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रतीक आहे.
#WATCH | Ayodhya Dhwajarohan | PM Modi and RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat ceremonially hoist the saffron flag on the Shikhar of the sacred Shri Ram Janmbhoomi Temple, symbolising the completion of the temple’s construction.
The right-angled triangular flag, measuring 10 feet… pic.twitter.com/Ip8mATz2DC
— ANI (@ANI) November 25, 2025
Akola News : आज अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या मंदिरावरील धर्मध्वजाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होतेय. यानिमित्ताने अयोध्येतील राम मंदिरावर डोळ्यांचे पारणे फोडणारा खास लेझर शो आयोजित करण्यात आलाय. या लेझर शोचं खास अकोला कनेक्शन समोर आलंय. मंदिरावरील लेझर शोचे ऍनिमेशन तयार करण्यात अकोल्यातील अभिषेक मानोरकर या तरूणाचाही वाटा आहेय. उत्कृष्ठ तांत्रिक कौशल्य आणि सुक्ष्म दृष्टीकोनातून हा लेझर शो तयार करण्यास आलाय. हा शो डिझाइन केलेल्या टीमचा अकोलेकर असलेला अभिषेक हा महत्वाचा भाग आहेय. अभिषेक हा अॅनिमेशन तंत्रज्ञानात शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहेय. सध्या तो कार्टून अॅनिमेशन क्षेत्रात काम करतोय. त्याच्या या कामाची अकोलेकरांमध्ये आनंदाची भावना आहेय.
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील नवाटोला परिसरात राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाला आहे.... मृतक महिलेचे नाव गीता प्रशांतकुमार श्रीवास्तव (50) असे आहे. तर गंभीर जखमी प्रशांतकुमार श्रीवास्तव हे सेलू पोलीस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. श्रीवास्तव दांपत्य नातेवाईकांचे लग्न समारंभ आटपून कार ने दोघेच रायपूर वरून वर्धेला जात असताना देवरी जवळील नवाटोला शिवारात भरधाव वेगात कार अनियंत्रित होऊन रस्त्याखालील खड्ड्यात अनियंत्रित झाल्याने झाडाला जावून आदळली. यात प्रशांतकुमार श्रीवास्तव यांची पत्नी गीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक प्रशांत कुमार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उद्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर
नगर परिषद निवडणुकीसाठी घेणार प्रचार सभा
बुधवारी नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चांदवड, पिंपळगावमध्ये सभा
गुरुवारी पाथरी, मानवत, परतूर, हदगाव, मुखेडमध्ये खासदार डॉ. शिंदे घेणार सभा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील प्रचाराच्या रिंगणात
तांत्रिक बिघाडामुळे अक्वा लाईन उशिराने
पिक अवर मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी हैराण
मेट्रो प्रत्येक स्टेशन वर नेहमीप्रक्षा जास्त वेळ थांबत पुढे जात असल्याची प्रवाशांची तक्रार
कफ परेड, सिद्धिविनायक या स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाश्यांचा संताप
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहा मतदार संघात जाहीर सभा घेतली या सभेमध्ये नाव न घेता आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर जोरदार टीका केली बाप एका पक्षात तर पोरगी दुसऱ्या पक्षात हा पॅटर्न लोह्यातून सुरू झालाय अशा पद्धतीचे राजकारण आम्ही जिल्ह्यात खपवून घेणार नाही त्यांच्या या टीकेला लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उत्तर दिलेले अशोक चव्हाण यांच्याकडे काही मुद्दे नाहीत त्यांना आता गल्ली मध्ये फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे भाजप मध्ये निर्णय घेण्याची पद्धत वेगळी आहे हे अशोक चव्हाण जिवंत असे पर्यंत त्यांना कळले तरी खूप झालं त्यांचा मुली साठी ते चोरून भाजप पक्षात आले ते भाजप मध्ये का आले याचा खुलासा अशोक चव्हाण यांनी करावा असे चिखलीकर म्हणाले
नगर परिषदेच्या निवडणुकीची राज्यभरात रणधुमाळी सुरू असतानाच मनमाडला एक दुःखद घटना घडली आहे..मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक १० अ मधील शिवसेना उबाठाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला..अचानक घडलेल्या या घटनेमुळे मनमाडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे..नितीन वाघमारे यांच्या निधनाने प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक कार्यक्रमावर काही अंशी परिणाम होणार आहे..
ते जनतेच्या पाठीशी आहेत पण जनता त्यांच्या पाठीशी नसेल असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे. अश्या अरेरावीने जनता पालकमंत्र्यांच्या पाठीशी राहणार नाही. कुठलाही नेता असू द्या संयमान चालावं डोक्यावर बर्फ तोंडात साखर व पायात भिंगरी पाहिजे संयमान चालाव लागेल. सत्ताधारी माणसानं तर फार संयमान बोलावं लागेल. जनता सुप्रीम आहे पालकमंत्री सुप्रीम नाही एवढं जनतेने लक्षात ठेवावं. असा टोला राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी जयकुमार गोरे यांना लगावला.
कराडला जेष्ठ नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी पूर्वसंध्येला आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. कराड नगरपालिका निवडणुक रिंगणात असलेल्या सर्व 9 नगराध्यक्षा पदाच्या उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणत शहराच्या विकासाचे रोल मॉडेल मांडण्यास सांगितले. या सुसंस्कृत राजकारण पहायला मिळाल्याची चर्चा कराडसह राज्यातील राजकीय नेत्याच्यांत चर्चा सुरू आहे.
खड्यांमुळे जखमी झालेल्या आणि जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याबाबत हद्दीचा मुद्दा उपस्थित करण्याच्या आणि जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेवरून उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिकेसह अन्य प्राधिकरणांना सोमवारी फटकारले.
तसेच, हा मुदा आपापसांत सोड़वा, अन्यथा सर्व प्राधिकरणांना समप्रमाणात पीडितांना भरपाई देण्याचे आदेश देऊ, असा इशारा न्यायालयाने दिला.
ऑगस्टमध्ये विक्रोळी येथे एका दुचाकीस्वाराचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला होता.
खड्डे टाळण्याचा प्रयत्न करत असताना या दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले होते.
हा मुद्दा सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी उपस्थित करण्यात आला. रस्त्यांच्या दुरवस्थेची जबाबदारी घेण्याऐवजी महापालिका आणि अन्य प्राधिकरणांचे अधिकारी एकमेकांना दोष देतात.
तथापि, 'आम्ही तुम्हाला ५०-५० टक्के भरपाई देण्याचे आदेश देऊ, मग तुम्ही सर्वजण आपापसात भांडत राहा आणि नंतर संबंधित प्राधिकरणाकडून भरपाईची रक्कम वसूल करा असे खडेबोल न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि संदीप पाटीलांच्या खंडपीठाने सुनावले
समित्यांनी सर्वच तक्रारींची दखल घ्यावी
भरपाईचा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर समिती स्थापन कण्याचे आदेश दिले आहेत.
या समित्यांनी खङ्गवांमुळे झालेल्या अपघातांशी संबंधित सर्व म्हणजेय समिती स्थापनेच्या आधी केलेल्या तक्रारीची दखल घ्यावी.
त्या तपासून तीन आठवडयांत भरपाईचा निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने अपघातात जखमी व मृतांना भरपाई देण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी स्थापनकरण्यात आलेल्या समितीची माहिती दिली
मृत्यूमुखी पडलेल्यांना ६ लाख, जखमींना ५० हजार ते अडीच लाख देण्याचे आदेश न्यायालयाने या पूर्वीच दिले होते
पुण्यातील पार्थ पवार यांचे जमीन गैर व्यवहार प्रकरण
सोमवारी पार पडलेल्या सुनावणीला शीतल तेजवानी यांची दुसऱ्यांदा गैरहजेरी
तेजवानी यांच्यासाठी वकील दिपाली केदार यांच्याकडून १ आठवड्याची हजर होण्यासाठी मुदत मागण्यात आली
शीतल तेजवानी यांना खरगे समितीसमोर हजर होण्यासाठी ४ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
यापूर्वी दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली आहे आणि आता शीतल तेजवानीला देखील दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे
पाटील, तेजवानी यांना मुदतवाढ दिल्यामुळे खरगे समितीचा अहवाल येण्यासाठी आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता
नर्तिका पूजा गायकवाडला न्यायालयाकडून जामीन मंजूर
राज्यभर गाजलेल्या उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी सत्र न्यायालयाने मंजूर केला जामीन
9 सप्टेंबरला बीडच्या लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती.
तेव्हापासून अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाड हिने बार्शी सत्र न्यायालयात अॅड.धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.
जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅड.धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलेले आहे.
मृताने आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही.केसचा तपास पूर्ण झालेला आहे.
त्यामुळे अशा परिस्थितीत महिला आरोपीला कारागृहात डांबून ठेवून काहीही साध्य होणार नाही,याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
त्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाने पूजा गायकवाड हिला जामीन दिला आहे.
धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आमदार प्रताप अडसड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. नगराध्यक्ष पदासाठी आमदार प्रताप अडसड यांच्या सख्ख्या बहीण डॉ अर्चना रोठे ह्या मैदानात आहे.. त्यामुळे या नगर पालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... भाजपच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने वर्षा देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे.. आरोप - प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही लढत लक्षवेधी ठरली आहे...
कोंग्रेस कडून आरोप करण्यात आला की मागील 15 वर्षापासून भाजपची सत्ता नगर पालिकेवर आहे पन या 15 वर्षात फक्त कागदोपत्री विकास झाला आहे आणि याठिकाणी फक्त घरानेशाही सुरु आहे तर भाजप कडून याला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले.. विरोधकांकड़े मुद्दा नाही त्यामुळे ते असे आरोप करताय आणि सर्वसामान्य नागरिक मागील 15 वर्षापासून भाजपला निवडून देताय अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. अर्चना रोठे यानी दिली.
भंडारा जिल्ह्यातील चार नगर पालिका निवडणुकीत उभ्या असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडाऱ्यात येत आहे. भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली इथ नगर पालिकेची निवडणूक होत असून भंडारा शहरातील दसरा मैदान इथ त्यांची जाहीर प्रचार सभा दुपारी 1 वाजता होत आहे.
सिंधुदुर्ग- शहर विकास आघाडी करून सर्व राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून कणकवली शहराच्या विकासाठी एकत्र आलो. भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली करायची आहे, असं संदेश पारकर म्हणाले. निलेश राणेंना आम्ही कणकवली शहराचे पालकत्व घ्यायला सांगितल. निलेश राणे आल्यामुळे भयमुक्त कणकवली झाली आहे. आता आपल्या कणकवली भ्रष्टाचार मुक्त केली पाहिजे. गेली आठ वर्षे सत्ता असून विकास करू शकले आहोत, ते आता सांगतायेत कणकवलीची सत्ता आमच्याकडे दया. नेत्यांनी धृतराष्ट्राची भूमिका सोडली पाहिजे. नेमका पैसा कोणाच्या घरात गेला याची चौकशी झाली पाहिजे, असंही संदेश पारकर म्हणाले.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- भारत
- Live Blog Updates: कित्येक पिढ्यांचे घाव आज भरलेत, कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक म्हणजे धर्मध्वज : पंतप्रधान नरेंद्र मोदी