जयपूर : मेवाडचे 13 वे राजे महाराणा प्रताप यांची जयंती आज संपूर्ण भारतात साजरी करण्यात येत आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार त्यांची जयंती ही 9 मे रोजी साजरी केली जाते. महाराणा प्रताप यांचा जन्म जेष्ठ मासच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथी मध्ये झाला होता. हिंदू तिथीनुसार त्यांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे.
राजस्थानमध्ये आणि हिमाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यांत महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या दिनानिमीत्त काही राज्यांत सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भावंडांमध्ये सर्वात मोठे
महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी एका राजपूत घराण्यात झाला. त्यांचे वडील उदय सिंह द्वितीय हे मेवाड वंशांचे 12 वे राज्यकर्ते आणि उदयपूरचे संस्थापक होते. महाराणा प्रताप यांना तीन भाऊ आणि दोन सावत्र बहिणी होत्या.
सात फूट पाच इंचाचे भारदस्त व्यक्तिमत्व
भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धविरांपैकी एक मानले जाणारे महाराणा प्रताप 2.26 मीटर (7 फूट 5 इंच) उंच होते. ते 72 किलोचे बॉडी आर्मर परिधान करायचे आणि 81 किलोचा भाला वापरत होते.
अकबरला तीन वेळा हरवलं
महाराणा प्रताप यांनी त्यांचा विरोधक मुघल सम्राट अकबरला युद्धात तीन वेळा हरवलं होतं. 1577, 1578, 1579 अशा सलग तीन वर्षे झालेल्या युद्धात त्यांनी अकबरला मात दिली होती.
महाराणा प्रताप यांना 11 पत्नी आणि 17 अपत्ये
महाराणा प्रताप यांना 11 पत्नी आणि 17 अपत्ये होती. महाराणा प्रताप यांच्यानंतर महाराणा अमर सिंह प्रथम हे त्यांचे उत्तराधिकारी बनले.
56 व्या वर्षी निधन
महाराणा प्रताप यांचा मृत्यू वयाच्या 56 व्या वर्षी झाला. 1597 साली शिकार करायला गेलेल्या महाराणा प्रताप यांचा अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut : राजकारण हे चंचल, कोणालाही मुठीत ठेवायला जमलं नाही; संजय राऊत यांचा पंतप्रधानांना टोला
- Petrol-Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरुच, डिझेलचा प्रवास शंभरीकडे
- Gold Smuggling Case : सांगली जिल्हा पुन्हा एनआयएच्या रडारवर; केरळमधील 100 किलो सोने तस्करी प्रकरणी सांगलीत तपास सुरु