Arif Mohammad Khan : भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या राजस्थानमधील उदयपूरमधील कन्हैया लालची तलवारीने गळा चिरून झालेल्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे. भारतात तालिबानी विचारसरणीच्या वाढत्या प्रसाराची सर्वांनाच चिंता आहे. मुस्लिम समाजातील एका वर्गातील वाढत्या सनातनी प्रवृत्तींवर टीका करायची की नाही? प्रश्न उपस्थित करायचे की नाही? असा विचार लोक करू लागले आहेत. 


समाजातील एका वर्गातील वाढत्या कट्टरतेच्या कारणांवरूनही विविध गोष्टी केल्या जात आहेत. दरम्यान, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मदरसे हे द्वेषाचे मूळ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, लहानपणापासून शिकवले जाते की कोणी विरोधात बोलले तर शिरच्छेद करा.


मदरशांमध्ये मुलांना कट्टर बनवले जात आहे: आरिफ मोहम्मद


आरिफ मोहम्मद म्हणाले, 'आमच्या मुलांना धर्मनिंदा करणाऱ्यांचे शिरच्छेद करायला शिकवले जात आहे का? हा प्रश्न आहे. मुस्लीम कायदा कुराणातून आलेला नाही, तो कोणी एका व्यक्तीने लिहिला असून त्यात शिरच्छेदाचा कायदा आहे आणि हा कायदा मदरशात मुलांना शिकवला जात आहे. राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लालच्या निर्घृण हत्येसंदर्भात त्यांनी या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, जेव्हा आम्हाला लक्षणे दिसतात तेव्हा आम्ही काळजीत असतो. परंतु, गंभीर प्रवृत्तीला स्वीकारण्यास नकार देतो.


आरिफ मोहम्मद खान यांची कट्टरतेवर अनेकदा टीका


आरिफ मोहम्मद खान अनेकदा म्हणतात की, मौलाना आणि मदरसे मुस्लिमांच्या एका वर्गाला कट्टरपंथी बनवत आहेत. ते गैर-मुस्लिमांबद्दल द्वेष शिकवतात, ज्यामुळे बालपणात इतर धर्मांबद्दल द्वेष निर्माण होतो. अशा परिस्थितीत, जेव्हा ते मोठे होतात, तेव्हा ते नेहमी इतर धर्माच्या लोकांबद्दल सावध असतात आणि संशयाने भरलेले असतात. आरिफ खानच्या यांच्या या विचारांवरही जोरदार टीका होते.


कन्हैया लालची निर्घृण हत्या


लक्षात ठेवा की कन्हैया लाल मंगळवारी संध्याकाळी उदयपूरमध्ये (Udaipur murder) त्याच्या टेलरिंगच्या दुकानात काम करत होता, तेव्हा दोन मुस्लिम तरुण आले आणि त्यांनी त्याला कपडे शिवण्याबाबत सांगितले. त्यातील एकाचे माप कन्हैया घेत असतानाच  अचानक खंजीराने हल्ला केला. या रानटी हल्ल्यात कन्हैया लालचा जागीच मृत्यू झाला. 


शवविच्छेदन अहवालात मारेकर्‍याने कन्हैया लालवर २६ वार केल्याचे समोर आले आहे. रियाझ अन्सारी आणि मोहम्मद घौस या दोन्ही मारेकर्‍यांना उदयपूरपासून 60 किमी अंतरावर असलेल्या राजसमंद येथून अटक करण्यात आली.


इतर महत्त्वाच्या बातम्या