Cryptocurrency Market Update : क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये दर घसरल्याने चांगलाच हाहाकार सुरु आहे. क्रिप्टो मार्केटमधून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर पैसे काढत आहेत. ज्यामुळे क्रिप्टो मार्केट त्याच्या बचावासाठी आले आहे. ही बातमी लिहित असतानाच्या वेळेपर्यंत बहुतेक क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) घट झाली आहे.
बिटकॉईनमध्ये जोरदार घसरण (Bitcoin)
बिटकॉइन त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून जवळपास ७० टक्के खाली आहे. altcoins देखील जोरदार घसरण नोंदवत आहे. क्रिप्टो बाजारातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या किमती 2.30 टक्क्यांनी घसरल्या आहेत. तर 7 दिवसांच्या व्यवहारात 1.51 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा प्रकारे बिटकॉइनची किंमत 20 हजार 882 डॉलर झाली आहे. बाजारी भांडवल 398,349,453,740 डाॅलर झाले आहे.
इथरियमची घसरण सुरूच
क्रिप्टो मार्केटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे चलन Ethereum 1.73 टक्क्यांनी घसरले आहे. तर ट्रेडिंगच्या शेवटच्या 7 दिवसात इथरियमची किंमत 4.01 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे इथरियमची किंमत 1,206 डॉलरवर आली. इथरियमचे बाजार भांडवल 146,397,289,023 डॉलर आहे.
Tether च्या किंमतीमध्येही घसरण
Tether ने 0.01 टक्के घसरण नोंदवली. ट्रेडिंगच्या शेवटच्या 7 दिवसात, Tether ची किंमत 0.05 टक्क्यांनी घसरली आहे. अशा प्रकारे Tether ची किंमत 0.999 डॉलर झाली.
Dogecoin च्या किंमतीत सुधारणा नाही
Dogecoin ने 6.86 टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. तर 7 दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये 16.18 टक्के वाढ नोंदवली गेली. Dogecoin किंमत 0.07155 डॉलर झाली आहे. क्रिप्टो मार्केटला भगदाड, बिटकॉइनमध्ये 70 टक्क्यांची मोठी घसरण!
क्रिप्टोकरन्सीवर टीडीएस
1 जुलैपासून क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका बसणार आहे. सर्व क्रिप्टो व्यवहारांवर 1 टक्के TDS भरावा लागेल. तो नफा असो वा तोट्यासाठी विकला गेला आहे. 2022-23 पासून क्रिप्टोकरन्सीजमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के भांडवली नफा कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 1 जुलैपासून क्रिप्टो व्यवहारांवरही 1 टक्के टीडीएस भरावा लागणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: