Madras High Court : रस्त्यावर दुचाकीवरुन स्टंटबाजी करणाऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे. हे प्रकरण चेन्नईमधील आहे.. उच्च न्यायालयानं एका युवकाला सशर्त जामीन मंजूर केला आहे. कोर्टाच्या निर्देशानंतर आता त्या तरुणाला सिग्नलवर मॅम्फ्लेट वाटावे लागणार आहेत. त्याशिवाय इन्स्टाग्रामवर रस्ते सुरक्षा अभियान राबवावं लागणार आहे... कोर्टाच्या आदेशानुसार तरुणाला सोशल मीडियावरुन लोकांना जागृत करावं लागणार आहे. विशेष म्हणजे, तरुणाचं वय पाहिल्यानंतर कोर्टानं सशर्त जामीन मंजूर केला आहे.
मद्रास हायकोर्टने 22 वर्षीय गोटला अॅलेक्स बिनॉय याचा जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याला निर्देश दिले आहेत की, इन्स्टाग्रामवर व्हिडीओ तयार करुन दारुच्या नशेत गाडी चालवण्याविरोधात आणि निष्काळजीपणानं गाडी चालवण्याविरोधात अभियान राबवण्याचे निर्देश दिले आहेत. बावीस वर्षीय गोटला एलेक्स बिनॉय याचे इन्स्टाग्रामवर 40 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मद्रास उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती एडी जगदीश चंदीरा यांनी गोटला याला जामीन मंजूर करत महत्वाचे निर्देश दिले. यामध्ये रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत लोकांमध्ये जागृतीसाठी सिग्नलवर पॅम्फ्लेट वाटण्यास सांगितलं. त्याशिवाय इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरही अभियान चालवावं, असं सांगितलं. त्याशिवाय दुचाकी चालवताना हेलमेट परिधान करणं आणि गाडी चालवताना सीट बेल्ट घालण्याचं महत्व काय? याबाबत व्हिडीओ तयार करत लोकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
चेन्नईमधील अन्ना सवाई येथील रस्त्यावर अनेक तरुण निष्काळजीपणाने दुचाकी चालवत दररोज स्टंटबाजी करत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच एका याचिकाकर्त्यानं कोर्टात धाव घेतली होती.
राज्य सरकारची बाजू मांडणाऱ्या वकिलानं तरुणाच्या जामीन अर्जाला विरोध केला. वाहन चालवणाऱ्याला माहित होतं की, अशाप्रकारे वाहन चालवल्याचा पायी चालणाऱ्यांना आणि इतरांना त्रास होऊ शकतो. तरिही त्यानं निष्काळजीपणाने गाडी चालवली. त्यामुळे जामीन मिळू नये. कोर्टानं तरुणाची जामीन याचिका स्विकारली... तसेच त्या तरुणाला अटक केली आणि तरुंगात टाकल्यास त्याच्या भविष्यावर प्रभाव पडू शकतो, असे मत कोर्टानं नमूद केले.
मद्रास हाय कोर्टानं बिनॉयचा जामीन मंजूर केला. लोकांमध्ये जागृती करण्याची सूचना केली. त्याशिवाय, राजीव गांधी सरकारी रुग्णालायत तीन आठवडे मंगळवार ते शनिवार पर्यंत सकाळी आठ ते दुपारी 12 पर्यंत वार्ड बॉयती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय तीन आठवड्यांपर्यंत चेन्नईच्या सिग्नलवर रोड सेफ्टीसंदर्भात पॅम्फ्लेट वाटण्याचे निर्देश दिले आहेत.