भोपाळ : मध्य प्रदेशातील बालाघाट येथील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तर पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. तर जखमींचा सर्व खर्च सरकारकडून करण्यात येईल, अशी माहिती शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
स्फोट नेमका कशामुळे झाला, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.