भोपाळ : प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरुणाने पाच लाख रुपयांच्या नोटांना आग लावली. हा तरुण एका खासगी फायनान्स कंपनीत कॅशिअर म्हणून काम करत असल्याचं कळलं. त्याने हे पैसे कंपनीच्या तिजोरीतून काढले होते.


मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी कॅशिअर जितेंद्र गोयलला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी जितेंद्र ही रक्कम प्रेयसीला दाखवण्यासाठी बेरावल गावात गेला होता, जेणेकरुन ती त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होईल.

पण प्रेयसीचं लग्न दुसरीकडे ठरलं होतं. त्यामुळे तिने जितेंद्रसोबत लग्न करण्यास नकार दिला. याच कारणामुळे नाराज झाल्याने त्याने त्याच्याजवळ असलेल्या पाच लाख रुपयांच्या नोटांना आग लावली.

नसरुल्लागंज पोलिसांच्या माहितीनुसार, स्पंदना स्फूर्ती फायनान्स कंपनीत जितेंद्र गोयल कॅशिअर म्हणून काम करत होता. त्याच्याकडेच या तिजोरीची किल्ली असायची. 17-18 एप्रिलच्या रात्री कंपनीच्या तिजोरीतून 6 लाख 74 हजार रुपये काढून जितेंद्र गायब झाला.

कंपनीच्या मॅनेजरच्या तक्रारीनंतर नसरुल्लागंज पोलिसांनी कॅशिअर जितेंद्रविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

दरम्यान, आग लावलेल्या रकमेत दोन हजार, पाचशे, दोनशे, शंभर रुपयांच्या नोटांचा समावेश होता. त्याच्याकडून 46 हजार रुपयेही जप्त करण्यात आला.