इंदूर: इंदूरमधून आपल्या पत्नीसोबत हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशी (Raja Raghuvanshi Murder) याची पत्नी सोनम तिचा कथित प्रियकर यांनी सुपारी देऊन केली अशी माहिती समोर आली होती. राजा रघुवंशीची (Raja Raghuvanshi) पत्नी सोनम रघुवंशी आणि तिच्या साथीदारांनी मिळून हे काम केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चौथा हत्येचा प्रयत्न होता. ही घटना 23 मे रोजी चेरापुंजीजवळील वेई सावडोंग धबधब्याजवळ घडली. त्यावेळी राजा आणि सोनम त्याच्या हनिमूनसाठी गेले होते. ईस्ट खासी हिल्सचे एसपी विवेक सीम यांनी गुरुवारी सांगितले की, सोनमसह सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या संपूर्ण कटाचा सूत्रधार सोनमचा प्रियकर राज कुशवाह होता.

Continues below advertisement

पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग नव्हती. राजचे तीन मित्र आकाश राजपूत, विशाल चौहान आणि आनंद कुर्मी यांनी त्याला मदत केली होती. हे तिघेही सोनम आणि राजा यांच्या आधी गुवाहाटी येथे पोहोचले होते. गुवाहाटीमध्ये राजाला मारण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. शिलाँग आणि पूर्व खासी हिल्समधील मावलाखियात गावाजवळ आणखी दोन प्रयत्न करण्यात आले पण ते अयशस्वी झाले. अखेर 23 मे रोजी दुपारी 2 ते 2.18 च्या दरम्यान, आरोपींनी वेई सावडोंग धबधब्याजवळ राजाला मारले.

त्या सर्वांनी एकामागून एक राजवर हल्ला केला

एसपी अभिषेक सीम म्हणाले की, त्या सर्वांनी एकामागून एक राजावर हल्ला केला. आकाशने त्याचा रक्ताने माखलेला शर्ट फेकून दिला आणि सोनमचा रेनकोट घातला. डीआयजी (ईस्टर्न रेंज) डेव्हिस एनआर मार्क म्हणाले की, सोनम सर्व दोष राजवर टाकत आहे, तर राज तिला दोष देत आहे. पण तिने कटात सहभागी असल्याचे कबूल केले आहे.

Continues below advertisement

11 मे रोजी झालेलं लग्न 

24 वर्षांची सोनम आणि 28 वर्षांचा राजा यांचे 11 मे रोजी लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसांनी ते कामाख्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला निघाले. 21 मे रोजी ते मेघालयात पोहोचले. तीन दिवसांनी दोघेही गायब झाले. 2 जून रोजी राजाचा मृतदेह धबधब्याच्या जवळील एका खोल दरीत आढळून आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राजाचा मृतदेह दरीपर्यंत नेण्यास मदत केली होती.

9 जून रोजी सोनम गाजीपूरमध्ये सापडली

9 जून रोजी सोनम उत्तर प्रदेशातील गाजीपूरमधील एका ढाब्यावर दिसली. तिला अटक करून शिलाँगला आणण्यात आले. बुधवारी मेघालय न्यायालयाने पाचही आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. एक एसआयटी (विशेष तपास पथक) त्यांची स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे चौकशी करत आहे.

सोनम राजच्या सतत संपर्कात होती

यूपी पोलिसांनी सांगितले की, हत्येपूर्वी सोनम राजच्या सतत संपर्कात होती. कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर) वरून असे दिसून आले की 16 मे ते 23 मे दरम्यान त्यांनी रात्री उशिरा संभाषणे आणि अॅप आधारित मेसेजसह 30 वेळा फोनवर बोलले. 15 मे रोजीच इंदूरमधील सोनमच्या घराजवळील एका कॅफेमध्ये दोघे कथितपणे भेटले तेव्हा कट रचण्यास सुरुवात झाली होती, असे निरीक्षणाच्या आकडेवारीवरून दिसून आले. कट उलगडण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक टीम आता जीपीएस लॉग, बॅकअप आणि डिलीट केलेल्या फाइल्सची तपासणी करत आहेत. तपास जसजसा पुढे जाईल तसतसे आणखी अटक होण्याची शक्यता आहे.