MP Election Result 2023 : मध्य प्रदेशच्या गडावर कोणाचा झेंडा फडकणार? भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच
Madhya Pradesh Assembly Election Results 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत सत्तेचा लंबक कोणाकडे असणार हे आता काही तासात स्पष्ट होणार आहे.
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Dec 2023 11:40 AM
पार्श्वभूमी
MP Election Result 2023 5 State Assembly Election Result : मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान सत्ता कायम राखणार की कमलनाथ धक्का देणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत...More
MP Election Result 2023 5 State Assembly Election Result : मध्य प्रदेशमध्ये शिवराज चौहान सत्ता कायम राखणार की कमलनाथ धक्का देणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत सत्ता खेचून आणली. मात्र, कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार ऑपरेशन लोट्समध्ये पाडण्यात आले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या आमदारांसह भाजपची वाट धरल्याने कमलनाथ यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणाऱ्या भाजपनं पहिल्यांदाच कोणत्याही नावाची घोषणा नाही. तिकीटाची घोषणा होतानासुद्धा शिवराज सिंह चौहान यांना देव पाण्यात घालून बसावं लागलं होतं. भाजपनं अपेक्षेप्रमाणे आपला प्रचार हिंदू मतांभोवतीच सुरु केला. सरकार आलं तर अयोध्येतील राम मंदिरांचं मोफत दर्शनाची सोय करु अशी घोषणा अमित शाहांनी केली होती. तर, दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी सॉफ्ट हिंदुत्ववादी भूमिका घेत, शिवराज यांच्या नीतींचा विरोध केला. त्यातच राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा प्रचारात आणत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं. ऑपरेशन लोटस, आदिवासींचे हक्क आणि शिवराज यांच्या विरोधातील नाराजी याच मुद्द्यांना प्रचारात केंद्रस्थानी आणत काँग्रेसनं सत्तेसाठी मोठी दावेदारी उभी केली.देशाचे लक्ष लागलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यामध्ये 80 टक्के मतदारांनी आपले मतदान केले. त्यामुळे 230 जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) हे भाजपची सत्ता कायम ठेवतात की काँग्रेसचे कमलनाथ (Kamal Nath) बाजी मारतात हे काही तासात स्पष्ट होणार आहे. त्या आधी एक्झिट पोलची आकडेवारी (Madhya Pradesh Exit Poll) समोर आली आहे. सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 125 जागा मिळण्याची शक्यता असून भाजपला 100 जागावर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमधील एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते? (Madhya Pradesh Election Exit Poll) काँग्रेस - 125 भाजप - 100बसपा - 02 एकूण जागा - 230 मध्य प्रदेश विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल (Madhya Pradesh Election Result 2018) भाजप - 165 काँग्रेस - 58बहुजन समाज पक्ष - 4इतर - 3
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
MP Election 2023 : मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत, मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आघाडीवर
MP Election 2023 : मध्य प्रदेशात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे. सध्या मध्यप्रदेशातील प्रमुथ नेत्यांची सध्याची स्थिती पाहता मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आघाडीवर आहेत.
- बुधनी - मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आघाडीवर
- छिंदवाडा - कमलनाथ आघाडीवर