भोपाळ : मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या अडीच तासांत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या फाईलवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

कमलनाथ सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


काय होतं काँग्रेसचं आश्वासन
मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येताच अवघ्या 10 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते.