Accident News: देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने (Heavy Rain) दुर्घटना घडत आहे. अशातच मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ९ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील (MP Accident News) सागर येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. मंदिराची भिंत कोसळल्याने 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याची घटना सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरात घडली आहे. या अपघातात 9 निष्पापांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मदतकार्य, बचावकार्य सातत्याने सुरू आहे. घटनास्थळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकारी उपस्थित आहेत.




मिळालेल्या माहितीनुसार, तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना ही दुर्दैवी (Accident News) घटना घडली आहे. येथे श्रावनामध्ये आयोजित कार्यक्रमासाठी शिवलिंगाची निर्मिती करण्यात येत होती. शिवलिंगाच्या उभारणीत अनेकांचा सहभाग होता. यामध्ये अनेक मुलांचाही सहभाग होता. यावेळी भिंत कोसळून 9 मुलांचा मृत्यू झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, ही दुर्दैवी (Accident News) घटना हरदयाल मंदिरातील असल्याचे सांगितले जात आहे. ज्याची भिंत 50 वर्षे जुनी आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये परिसरातून मलबा हटवताना दिसत आहे. गावातील अनेक लोकांसह अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत. 


चार लाखांची भरपाई जाहीर केली


मध्य प्रदेशचे (MP Accident News) मंत्री गोविंद राजपूत म्हणाले, दुर्घटनास्थळी प्रशासन वेगाने काम करत आहे. आम्ही सर्व घटनास्थळी उपस्थित आहोत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये, तर जखमींच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.


रीवामध्ये 4 मुलांवर पडली भिंत 


तर दुसरी घटना आहे ती एक दिवसापूर्वी रीवा येथे भिंत कोसळून 4 मुलांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मुलांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. याप्रकरणी शनिवारी दोघांना अटकही करण्यात आली आहे.