जयपूर : जंगलचा राजा म्हणून सिंहाची ओळख असली तरी वाघासारखा डौलदार प्राणी तसा विरळाच. राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील मछली वाघीण त्याला अपवाद कशी ठरणार. इतकंच काय, मछलीच्या शिरपेचात असे अनेक मानाचे तुरे रोवले गेले आहेत.

 
रणथंबोरची राणी म्हणून मछली वाघीण प्रसिद्ध आहे. मछली 30 मे रोजी 20 वर्षांची झाली. वाघांचं आयुष्य तसं 10 ते 15 वर्षांचंच. त्यामुळे मछलीचं महत्त्व वेगळं.

 
जगातली मोस्ट फोटोग्राफ्ड म्हणजे सर्वाधिक फोटो काढली गेलेली अशी मछलीची ख्याती आहे. ही वाघीण राणी माँ, रणथंबोरची राणी म्हणूनही नावाजली गेली आहे. तिच्यावर अनेक डॉक्युमेंट्रीजही तयार झाल्या आहेत. विशेष म्हणजे तिला जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

 
तिला पाहण्यासाठी राजस्थानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही मोठी आहे. तिच्यामुळे पर्यटन क्षेत्रात वर्षाला किमान 60 ते 70 कोटी रुपयांची भर पडते.

 

 

मछलीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेट यूझर्सचं लक्ष वेधून घेत आहे. काही वर्षांपूर्वी मछलीने एका 14 फुटी मगरीला मारले, त्या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ती एक आई आहे, शिकारी आहे आणि राणीही!

 
मछलीला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आज मछलीचे दात पडले आहेत, वार्धक्याच्या खुणा तिच्या चेहऱ्यावर दिसतात, मात्र तो दिमाख आजही कायम आहे.

 

पाहा व्हिडिओ :