नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किंमती गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 10 रुपयांची कपात करण्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने केली आहे. हे नवीन दर आजपासून म्हणजे 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. गेल्या काही महिन्यांत गॅस सिलेंडर्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि आता कमी करण्यात आलेली किंमत यात बरीत तफावत आहे. परंतु त्यातून थोडा का होईना दिलासा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे.
फेब्रुवारीपासून गॅस सिलिंडर 125 रुपयांनी महाग
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती गेल्या काही महिन्यांत सतत वाढल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातच गॅसच्या किंमतीत तीन वेळा एकूण 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी मार्चच्या सुरूवातीला गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली. म्हणजेच फेब्रुवारीपासून गॅस सिलेंडर 125 रुपयांनी महाग झाले.
नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सामान्यांना झटका; जवळपास सर्व बचत योजनांमध्ये व्याजदरात कपात
देशभरात दर महिन्याला 14 कोटी घरगुती एलपीजी सिलेडरचा वापर होतो. म्हणजेच इंधनाच्या दरात होणाऱ्या या कपातीचा फायदा या सर्वांना होणार आहे. देशातील प्रत्येक गॅस सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी सरकारने उज्ज्वलासारखी योजना सुरु केली. यामुळे, 2014 मध्ये जिथे एलपीजी वारणाऱ्यांची संख्या देशभरात 55 टक्के होती, ती आता 99 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
सिलेंडर स्वस्त कसा मिळवाल?
इंडियन ऑईलच्या मते, जर तुम्ही एलपीजी सिलिंडर म्हणजेच इंडेन गॅस सिलिंडर बुक कराल तर त्यावर तुम्हाला 50 रुपयांची कॅशबॅक मिळू शकेल. हे करण्यासाठी, आपल्याला अॅमेझॉन (Amazon) पेद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करावा लागेल. अॅमेझॉन पे वरून गॅस सिलेंडरची रक्कम भरताच तुम्हाला 50 रुपयांच्या कॅशबॅकचा फायदा मिळेल आणि अशा प्रकारे आपल्याला गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्त मिळेल.