LPG Cylinder Price Hike : एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनता हैराण झाली असताना दुसरीकडे आता घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढण्याची शक्यता असल्यामुळे सामान्यांचं कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात घरगुती सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे त्याचा परिणाम आता एलपीजी इंधनाच्या किंमतीवर होण्याची शक्यता आहे. 


सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना मोठ्या तोट्यास सामोरं जावं लागत असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किंमती लक्षात घेता एलपीजीच्या विक्रीवर 100 रुपये प्रति सिलेंडर नुकसान होत आहे. त्यावर सरकारकडून देण्यात येणारे अनुदानही बंद आहे. घरघुती सिलेंडरच्या किंमती किती प्रमाणात वाढवायच्या हे केंद्र सरकारच्या हातात आहे. या आधी 6 ऑक्टोबरला घरघुती सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ झाली होती. जुलैपासून विचार करता घरघुती सिलेंडरच्या किंमतीत आतापर्यंत 90 रुपयांची वाढ झाली आहे. 


LPG Cylinder Price Hike : महागाईचा सर्वसामान्यांना चटका; घरगुती सिलेंडरचे दर पुन्हा कडाडले


एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलेंडच्या किमतींमध्ये 200 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता दर वाढून 884.5 रुपयांवर पोहोचले आहेत. 2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरचे दर वाढून 719 रुपये इतकी झाली आहे. त्यानंतर सिलेंडच्या किमती 15 फेब्रुवारी रोजी 769 रुपये, 25 फेब्रुवारी रोजी 794 रुपये, 1 मार्च रोजी 819 रुपये, 1 एप्रिल रोजी 809 रुपये, 1 जुलै रोजी 834.5 रुपये, 18 ऑगस्ट रोजी 859.5 रुपये इतक्या होत्या. त्यानंतर 6 ऑक्टोबरला घरघुती सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ झाली होती.


Rahul Gandhi : राहुल गांधींनी सांगितला GDP चा अर्थ, म्हणाले.. गॅसच्या किमतीत 116 टक्के वाढ


दरम्यान, तेल कंपन्यांनी दर महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या किमतींची समिक्षा करतात. त्यानंतर किमती वाढवणं किंवा किंमतींमध्ये घट करणं यासंदर्भात निर्णय घेण्यात येतो. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असतो. याच कारणामुळे गॅसच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळतो. सध्या केंद्र सरकार एका वर्षात ग्राहकांना 12 घरगुती गॅस सिलेंडरवर अनुदान देतं. जर एखादा ग्राहक याहून अधिक वापर करत असेल तर त्याला बाजारभावाने खरेदी करावी लागते.


Petrol Diesel Price : दोन दिवसांनी आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल; मुंबईत विक्रमी वाढ