Love marriage tradition : भारतात आज देखील नातेवाईकांच्या मनाविरोधात जाऊन लग्न करणे सोपे नाही. देशात बहुतकरुन आत्पस्वकियांच्या आणि कुटुंबातील लोकांच्या मर्जीनुसारच विवाह लावले जातात आणि केले देखील जातात. लव्ह मॅरेज किंवा ज्याला प्रेम विवाह म्हणतात ही पद्धत भारतात अद्याप रुजलेली नाही. मात्र, महाराष्ट्राच्या शेजारी राज्यात म्हणजेच गुजरातमध्ये भाटपोर नावाचं एक गाव आहे, या गावातील लोकांचा विचार थोडा वेगळा आहे. या गावातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी प्रेमविवाह केलाय. इतकचं नाही तर मागील तीन दशकांपासून प्रेमविवाह करण्याची पद्धत या गावात वाढलीये. त्यामुळे हे गाव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झालंय.

भाटपोर हे गाव गुजरातमधल सूरतजवळ आहे. येथील जवळपास 90 टक्के लोक गावातल्या गावातचं विवाह करतात. येथील लोक त्यांच्या जोडीदाराला स्वत:निवडतात आणि आपल्या कुटुंबियांच्या सहमतीने लग्न करतात. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ आणि वृद्ध लोक सुद्धा या परंपरेला सपोर्ट करतात. आजी-आजोबांनी देखील लव्ह मॅरेज केलेले असते. त्यामुळे तेही विरोध करत नाहीत. 

स्वत:च्या गावातील जोडीदारच निवडतात 

भाटपोर गावात अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "आमच्य गावात प्रेमविवाह करण्याची परंपरा आहे. गावातील मुलं आणि मुली प्रेम विवाहचं करतात. ही परंपरा 2-3 पिढ्यांपासून सुरू आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे." एखाद्याला प्रेमविवाह करायचा असल्यास गावातील वडीलधारी मंडळीही त्याची पूर्णपणे जबाबदारी घेतात. या परंपरेनुसार गावातील लोक गावाबाहेर लग्न करणे टाळतात.

भाटपोरमध्ये प्रेमविवाह हा ट्रेंड नसून परंपरा बनली आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की प्रेमाने बनवलेले नाते अधिक घट्ट असते आणि म्हणूनच ते स्वतःचा जोडीदार निवडतात. या गावात होणारे विवाह इतर गावांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत, कारण येथे कुटुंबांना अशा निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज पडत नाही.

याशिवाय येथील लोक त्यांच्या नात्याकडे पूर्णपणे स्वतंत्रपणे पाहतात. कुटुंबियांचा असा विश्वास आहे की, जर मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करत असतील तर ते लग्न करण्यास मोकळे आहेत. या गावातील वडीलधाऱ्यांचाही आपल्या मुला-नातवंडांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे येथील नातेसंबंध घट्ट होतात आणि घटस्फोटाचे प्रमाणही खूप कमी आहे. भारतातील बहुतेक लोक लग्नाला योग्य मानतात, भाटपोर गावाचे हे उदाहरण दाखवते की प्रत्येक गावाची स्वतःची परंपरा आणि संस्कृती आहे. येथील लोक अभिमानाने ही परंपरा पुढे चालवत आहेत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट, सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड विजेती; इशान किशनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?

डेव्हिड वॉर्नरची लॉलीपॉप खात हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, रॉबिनहूड सिनेमाचा ट्रेलर लाँच; इव्हेंटमध्ये श्रीलीलासोबतही थिरकला