Loudspeaker Issue in Uttar Pradesh : सध्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरुन राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्रात भोंग्यावरुन वातावरण तापले असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने मशिदीवरील भोंगे खाली उतरवले आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत 1 लाख लाउडस्पीकर खाली उतरवले आहेत. त्यामुळे राज्यात लाउडस्पीकरमुळे होणारा गोंगाट कमी झाल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
आमच्या सरकारने हा मुद्दा चांगला हाताळला आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरुन सुमारे 1 लाख लाउडस्पीकर काढण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर काढल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाज कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही. उत्तर प्रदेशातील पोलीस सातत्याने लाऊडस्पीकर विरोधात मोहीम राबवत आहेत.
रस्त्यावर पाडण्यात येमार नमाज बंद
सीएम योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका मुद्द्यावरुन आपल्या सरकारचे कौतुक केले आहे. आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही, तर रस्त्यावरील नमाजाचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करु नये, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या होत्या. आता रस्त्यावर कोणीही नमाज अदा करत नसल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. यूपीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 25 कोटींच्या आसपास आहे. त्यानंतरही ईदसारख्या मुहूर्तावर कुठेही रस्त्यावर नमाज अदा केल्याचे वृत्त नाही. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज अदा करुन या नव्या आदेशाचे पालन करत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: