Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ((Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting) पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Loksabha Election) कानपूर लोकसभा (Kanpur Loksabha) जागेवर चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, या जागेवर भाजपमधील घमासान कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. भाजपने कानपूरच्या जागेवर नवा चेहरा रमेश अवस्थी यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या नावाबाबत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
भाजपचे (BJP) उमेदवार रमेश अवस्थी यांना तिकीट मिळाल्यापासून ते चर्चेत आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये हे नाव नवीन आहे. त्यानंतर त्याच्या निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत कानपूरमधील भाजपचे माजी उपाध्यक्ष, विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक, दिग्गज नेते प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पत्र लिहून कानपूरमधील उमेदवाराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, 400 पारचा संकल्प पूर्ण करणे कठीण आहे.
कोण आहेत प्रकाश शर्मा?
कानपूरच्या दिग्गज नेत्यांमध्ये प्रकाश शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांनी भाजप, विहिंप, बजरंग दल अशा अनेक मोठ्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले आहे. शहराच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकारणातही त्यांचा मोठा वावर आहे. मात्र, भाजपने कानपूरसाठी उमेदवार रमेश अवस्थी यांच्या निवडीबाबत पंतप्रधानांना पत्र लिहून राजकीय खळबळ माजवली आहे.
पत्र पंतप्रधान मोदींना लिहिले
पंतप्रधानांना लिहिलेले हे पत्र व्हायरल झाले असून, त्यात कानपूरची भूमी क्रांतिकारकांची भूमी असल्याचे लिहिले आहे. या भूमीवरून जनसंघ आणि भाजपसाठी मैदान तयार करण्यात आले. इथं पक्षाने असा उमेदवार उभा केला आहे ज्याची ओळख कार्यकर्त्यांमध्येही नाही. रमेश अवस्थी यांनी भाजपचे सदस्यत्व कधी घेतले आणि पक्षासाठी त्यांनी काय योगदान दिले, याची माहितीही येथील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नाही.
तर तुमचा 400 पारचा संकल्प अपूर्णच राहील
त्यांनी लिहिले की, कानपूरची भूमी कार्यकर्त्यांविना झाली आहे का? पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असून ते अंतर्गत वाद घालत आहेत. असेच चालू राहिले तर तुमचा 400 पारचा संकल्प अपूर्णच राहील. कानपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रमेश अवस्थी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्याआधीच या पत्रावरून वाद सुरू झाला आहे. बंडखोरी आणि भांडणामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या