Lok Sabha Election 2023 :  राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुका पार पडणार आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन पक्षांमध्ये  सरळ लढत होणार आहे. तर, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांच्या नेतृत्वातील आघाडीमध्ये सरळ लढत होणार आहे. राजस्थानमध्ये लोकसभेच्या 25 जागा आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने क्लीन स्वीप विजय मिळवला होता. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीबाबतचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंडिया टीव्ही-सीएनएक्सने निवडणूक पूर्व सर्वे केला आहे. यंदाची लोकसभा निवडणूक ही भाजप-एनडीए (BJP) आणि काँग्रेस-इंडिया (Congress India) आघाडीत होणार आहे. 

या सर्वेनुसार, आता लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तर भाजपचा वरचष्मा राहण्याचा अंदाज आहे. भाजपला 25 पैकी 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, काँग्रेसला फक्त दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळत असल्याचा अंदाज असला तरी ही स्थिती समाधानकारक असल्याचे म्हणावे लागेल. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे काँग्रेसने काही महिने आधी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवला होता. 

मतांच्या टक्केवारीत भाजपला आघाडी

सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा आठ टक्के जास्त मते मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 49 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के मतदारांचा कौल मिळणार असल्याचा अंदाज आहे.  राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता कायम ठेवणार असल्याचा विश्वास आहे. तर, भाजपलाही सत्तेत पुनरागमन करणार असल्याचा विश्वास आहे. दोन्ही पक्षांमध्ये विशेषत: भाजपमध्ये पक्षांतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. 

केंद्रात भाजप सत्तेत, पण....

केंद्रात भाजप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, भाजपला 300 पेक्षा कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काँग्रेसच्या जागा 52 वरून 70 पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या सर्वेक्षणात यूपी, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातचीही माहिती समोर आली आहे. गुजरात आणि उत्तराखंडच्या सर्वेक्षणात भाजप लोकसभेच्या सर्व जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

इतर  महत्त्वाच्या बातम्या :