Corona Vaccination Live Update : शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतली

सरकारने लसीची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 लागतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Mar 2021 03:16 PM
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जे जे रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. भारत बायोटेकती कोवॅक्सिनची लस घेतल्याची माहिती शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. तसंच ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला कोविन अॅपच्या अडचणींचं ग्रहण लागलंय. आजपासून मोफत लसीकरणाला सुरुवात होतेय. पण त्यात पुन्हा एकदा कोविन अॅपमुळे अडथळा निर्माण झालाय. कोविन अॅपचं सर्व्हर सकाळपासून डाऊन असल्यानं लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या अडचणीत येत आहेत. 60 वर्षांवरील वृद्धांसाठी कोविन अॅपवर नोंदणी करत असताना सर्व्हर डाऊनचा मेसेज येतोय.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार कोरोना लस घेण्यासाठी जेजे रुग्णालयात दाखल, थोड्याच वेळात घेणार लस
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

पार्श्वभूमी

देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी आजपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु होणार आहे.  लसीकरणाबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.


 


कोरोन लस 250 रुपयात मिळणार


 


सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाची लस मोफत मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांसाठी केंद्र सरकारने कोरोना लसीची किंमत निश्चित केली आहे. सरकारने त्याची किंमत 250 रुपये निश्चित केली आहे. खासगी रुग्णालये कोरोनाच्या लसीच्या प्रत्येक डोसाठी 250 रुपये शुल्क आकारू शकतात. म्हणजे एकूण दोन डोससाठी 500 लागतील.


 


नोंदणी न केल्यास लस मिळणार का?


 


लसीकरणासंदर्भात यावेळी सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जे नोंदणी करत नाहीत त्यांना लस मिळणार की नाही? ऑनलाईन नोंदणी व्यतिरिक्त लोकांना 'वॉक इन रजिस्ट्रेशन' ची सुविधा देखील देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यांना मोबाईल जास्त हाताळता येत नाही किंवा ऑनलाईन नोंदणी करता नाही, ते थेट रुग्णालयात जाऊन ही लस घेऊ शकतात. मात्र ऑनलाईन नोंदणी किंवा अॅपद्वारे नोंदणी करणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.


 


लसीसाठी आपली नोंदणी कशी करावी


 


सरकारी अधिसूचनेनुसार, ही लस घेण्यासाठी नागरिकांनी प्रथम को-विन अ‍ॅपवर नोंदणी केली पाहिजे. एकदा नोंदणी झाल्यावर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. यामध्ये लस घेण्याची तारीख, ठिकाण आणि वेळ याविषयी माहिती देण्यात येणार आहे.


 


नोंदणीसाठी कोणती ओळखपत्रे वैध असतील?


 


आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, जॉब कार्ड, मनरेगा कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, खासदार, आमदार व एमएलसी यांनी दिलेली अधिकृत ओळखपत्र इत्यादी ओळखपत्र नोंदणीस वैध असतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.