मुंबई : देश सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, मात्र या संकटातून देश पूर्णपणे मुक्त झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे महत्त्वाचे आहे, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रशासन आणि सरकारकडून जनजागृती केली जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक लहान मुलगा लोकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करत आहे. व्हिडीओतील या लहान मुलाचं सर्वत्र कौतुक होत आहे, तर दुसरीकडे लोकांना बेजबाबदारपणाही दिसून येत आहे.
लोकांना मास्क घालण्याचं आवाहन करणाऱ्या या लहान मुलाचा व्हिडीओ हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील असल्याचं बोललं जात आहे. व्हिडीओत जे दिसतंय त्या प्रमाणे हा लहान मुलगा एका बाजारेपेठेत उभा आहे. तेथे येणाऱ्या नागरिकांवर त्यांची बारीक नजर आहे. याठिकाणी जे कुणी विनामास्क फिरत आहे त्यांना तो मास्क घालण्याचं आवाहन करत आहे. निरागसपणे 'मास्क कुठे आहे?' असं हा मुलगा लोकांना विचारत आहे. हे करते वेळी त्यांच्या हातात एक काठी आहे. ज्यांनी मास्क घातले नाहीत, त्यांच्यावर हा मुलगा काठी उगारत आहे, मात्र मारत नाहीये. इन्स्टाग्रामाच्या DharamshalaLocal अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
मास्क लावण्याचं वारंवार आवाहन केलं जातं मात्र लोक काही ऐकत नाहीत. लोक अजूनही कोरोनाला हलक्यात घेत आहेत. मात्र एका लहान मुलांना जी गोष्ट कळते ती सुशिक्षित नागरिकांना का कळत नाही? हे या व्हिडीओतून दिसून येत आहे. व्हिडीओत दिसणारा मुलगा अत्यंत गरीब असल्याचे त्यांच्या कपड्यांवरुन दिसत आहे. एवढंत नाहीतर त्याच्या पायात चप्पल देखील नाहीये. मात्र याही स्थितीत तो लोकांना मास्क घालण्याचं आवाहन करतोय.