नवी दिल्ली : अच्छे दिनचा नारा देत सत्तेत आलेल्या मोदी सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले. या तीन वर्षात सरकारने अनेक कामं केली, अनेक आश्वासनं दिली, तर अनेक प्रश्नांवरुन सरकारला जनतेच्या रोषाचाही सामना करावा लागला. मोदी सरकारमधील मंत्र्यांनी तीन वर्षात कशा प्रकारे काम केलं, याची पडताळणी 'एबीपी न्यूज'च्या तज्ज्ञांनी केली आहे.


एबीपी न्यूजने मोदी सरकारमधील 24 मंत्र्यांना त्यांच्या कामकाजाच्या आधारे 50 तज्ञांच्या टीमने गुण दिले. या टीममध्ये देशभरातील नामांकित 50 पत्रकारांचा समावेश होता. मंत्र्यांना दहापैकी गुण देण्यात आले. ज्यांना पाचपेक्षा कमी गुण मिळाले, त्यांना खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

  1. हरसिमरत कौर, अन्न प्रक्रिया मंत्री


मोदी सरकारमध्ये खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांमध्ये अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर अव्वल आहेत. एबीपी न्यूजच्या तज्ञांच्या टीमने त्यांना 3.87 गुण दिले आहेत.

  1. उमा भारती, जलसंधारण मंत्री


तीन वर्षांमध्ये सर्वात खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत जलसंधारण मंत्री उमा भारती आहेत. एबीपी न्यूजच्या एक्स्पर्ट पॅनलने उमा भारतींना 3.86 गुण दिले आहेत.

  1. महेश शर्मा, पर्यटन मंत्री


खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत देशाचे पर्यटन मंत्री महेश शर्मा तिसऱ्या स्थानावर आहेत. एक्स्पर्ट पॅनले त्यांना 4.32 गुण दिले आहेत. महेश शर्मांना मंत्रिमंडळात ठेवून मोदी त्यांच्यावर उपकारच करत असल्याचं पत्रकार अभय दुबे यांनी म्हटलं आहे.

  1. राजीव प्रताप रुडी, कौशल्य विकास मंत्री


कौशल्या विकासाच्या माध्यमातून देशातील लाखो युवकांना रोजगार देत असल्याचा दावा करणारे कौशल्य विकास मंत्री राजीव प्रताप रुडी खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत आहेत. त्यांना 4.46 गुण देण्यात आले आहेत. कौशल्य विकास प्रमाणपत्र असलेल्या युवकाला कुणी 500 रुपयेही द्यायली तयारी नाही, तर ते कौशल्य काय कामाचं, असा सवाल जेष्ठ पत्रकार राजकिशोर यांनी केला आहे.

  1. मुख्तार अब्बास नकवी, अल्पसंख्यांक कल्याण मंत्री


अल्पसंख्यांक कल्याण मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना एक्स्पर्ट पॅनलने 4.52 गुण दिले आहेत.