मोदींच्याच गुजरातमध्ये जीएसटीला विरोध, व्यापाऱ्यांवर लाठीचार्ज
एबीपी माझा वेब टीम | 03 Jul 2017 03:05 PM (IST)
सूरत : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात एक करप्रणाली अर्थात जीएसटी लागू केला. मात्र मोदींच्याच गुजरातमध्ये व्यापाऱ्यांनी जीएसटीविरोधात अनिश्चित काळासाठी बंद पुकारला आहे. सुरतमध्ये कापड मार्केट बंद करुन व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाला. पण सूरतचे कापड आणि दुसरे व्यापारी जीएसटीला पूर्वीपासूनच विरोध करत होते. जीएसटी हटवून सोपी करप्रणाली आणावी, अशी मागणी व्यापारी करत आहेत. दरम्यान, व्यापाऱ्यांनी जीएसटीच्या विरोधात झासी एक्सप्रेस कानपूरजवळ अडवली होती. पाहा व्हिडीओ