Attack on BJP Office Tamilnadu : तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर एका व्यक्तीने रात्रीच्या सुमारास हल्ला केला. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हा हल्ला करण्यात आला.


भाजप कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याची वृत्त आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. या हल्ल्यामागे अंतर्गत वादाचे कारण आहे की अन्य कोणते कारण आहे याचाही शोध घेतला जात आहे. या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात भाजप कार्यालयाचे मोठे नुकसान झाले नाही. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला.  


 






दरम्यान, यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 29 भारतीय मच्छिमार आणि त्यांच्या 79 मासेमारी नौकांच्या सुटकेसाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली. श्रीलंकेच्या नौदलाने काही आठवड्यात तामिळनाडूतील मच्छिमारांना अटक केल्याच्या तिसऱ्या घटनेकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधत मुख्यमंत्री म्हणाले की, या घटनेने राज्यातील जनतेला धक्का बसला आहे. 


11 भारतीय मच्छिमारांना 7 फेब्रुवारी रोजी श्रीलंकन ​​नौदलाने अटक केली आणि मायिलाट्टी नौदल तळावर नेले, असल्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले. मागील काही दिवसांमध्ये श्रीलंकन नौदलाकडून भारतीय मच्छिमारांना अटक करण्याचे प्रमाण वाढले असल्याचे म्हटले जाते. या घटनांवरूनच तामिळनाडूमध्ये नागरिकांमध्ये नाराजी आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha