India Covid-19 Cases : देशात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 364 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, काल देशात 1 हजार 829 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 33 जणांचा मृत्यू झासा होता. आज त्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.  


सक्रिय रुग्णांची संख्या  15 हजार 419 वर


दरम्यान, सध्या देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 419 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपेक्षा आज आढळलेली रुग्णसंख्या ही जास्त आढळले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये दिलासा मिळला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासानू कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. ज्याकडे कोरोनाची पुढची लाट म्हणून पाहिले जात आहे. कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये सातत्याने घट होत आहे. मात्र, कालच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडाही खाली आला आहे. आता भारतात कोरोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ही 4 कोटी 31 लाख 29  हजार 563 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या ही 5 लाख 24 हजार 303 वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


वेगाने लसीकरण सुरु


सध्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी जलद लसीकरण देखील सुरु आहे. आता लोकांना बूस्टर डोस देण्यावर भर देण्यात येत आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस मिळू शकतो. याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतर तुम्ही तुमचा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस घेऊ शकता. मात्र, सरकार लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करू शकते, असे बोलले जात आहे.


महाराष्ट्र कोरोना


महाराष्ट्रात कोरोना (Coronvirus) रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात काल रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केला आहे. काल नव्या 307 रुग्णांची भर पडली आहे तर 252 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काल एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे.