बंगळुरु : 31 डिसेंबरला बंगळुरुत होणाऱ्या नव्या वर्षाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनला बोलावल्यास सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा कर्नाटक रक्षणा वेदिका युवा सेनेने दिला आहे. बंगळुरुतील मान्यता टेक पार्कसमोर कर्नाटक रक्षणा वेदिका युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनंही केली.
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या कार्यक्रमाला सनी लिऑनला बोलावणं म्हणजे कर्नाटकच्या संस्कृतीच अपमान करणारं ठरेल, असे म्हणत यावेळी कार्यकर्त्यांनी सनी लिऑनच्या फोटोंची जाळपोळ केली.
कर्नाटक रक्षणा वेदिका युवा सेनेच्या या निदर्शनांची कर्नाटक सरकारनेही तातडीने दखल घेतली आहे.
"सनी लिऑनचा कोणताही कार्यक्रम न आयोजित करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. कारण लोकांचा विरोध आहे. मात्र कर्नाटकच्या संस्कृतीचं आणि साहित्याचं दर्शन घडवणारे कार्यक्रम व्हावेत. कारण तो आपला वारसा आहे.", अशी माहिती कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
दरम्यान, कर्नाटक रक्षणा वेदिकाच्या हरीश यांनी कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
'सनी लिऑनचा कार्यक्रम झाल्यास सामूहिक आत्महत्या करु'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2017 10:51 AM (IST)
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या कार्यक्रमाला सनी लिऑनला बोलावणं म्हणजे कर्नाटकच्या संस्कृतीच अपमान करणारं ठरेल, असे म्हणत यावेळी कार्यकर्त्यांनी सनी लिऑनचे फोटोंची जाळपोळ केली.
सनी लिऑन
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -