आंध्रमध्ये कृष्णा नदीत प्रवासी बोट पलटली, 26 जण बुडाले!
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2017 10:40 PM (IST)
38 प्रवाशांना घेऊन ही बोट भवानी बेटावरुन पवित्र संगम घाटाकडे निघाली होती.
विजयवाडा : आंध्र प्रदेशमधील विजयवाड्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीमध्ये प्रवासी बोट पलटली. या दुर्घटनेत 26 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कृष्णा आणि गोदावरी नदीचं संगम जिथे होतं, त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. 38 प्रवाशांना घेऊन ही बोट भवानी बेटावरुन पवित्र संगम घाटाकडे निघाली होती. आतापर्यंत 16 लोकांचे मृतदेह शोधण्यात आले आहेत. इतर मृतदेहांचा शोध सुरु आहे. https://twitter.com/NDRFHQ/status/929726609136824320 बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. एनडीआरएफची पथकं घटनास्थळी दाखल असून, शोधकार्य सुरु आहे. जिल्हाधिकारी बी. लक्ष्मीकान्थमही घटनास्थळी उपस्थित असून, ते सर्व शोधकार्यावर लक्ष ठेवून आहेत.