नवी दिल्ली: लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
लोकसभेमध्ये आज लक्षवेधी उपस्थित करत खासदार धनंजय महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
शाहू महाराज यांचं कार्य महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक इतिहासामध्ये महत्त्वाचं आहे. आज आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची गोष्ट होते, पण देशात पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लागू केलं होतं, असं म्हणत धनंजय महाडिक यांनी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली.
यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला आहे. त्यामुळे शाहू महाराजांनाही भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान सरकारने करावा, असं धनंजय महाडिक म्हणाले.
धनंजय महाडिक
लोकराजा शाहू महाराज
छत्रपती शाहू महाराज हे खरेखुरे लोकराजे होते. कोणत्याही बदलाची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली. त्यांनी शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, कृषी यासारख्या सर्व विषयांमध्ये मोठं काम केलं.
देशात त्याकाळी मागासलेल्या जातींमध्ये शिक्षणाबद्दल आस्था नव्हती, नोकरीत स्थान नव्हते. त्यावेळी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण लागू केलं होतं.
कोल्हापूर संस्थानातील मुलांना उच्चशिक्षण मिळावं म्हणून त्यांनी विविध जातीची वसतिगृहे बांधली. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही उच्च शिक्षणासाठी मदत केली.
असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये शाहू महाराजांनी काम केलं नाही.
भारतरत्न पुरस्कार
1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर भारतरत्न कोणालाही जाहीर झालेला नाही.
आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी :
पुरस्कारार्थीचे नाव वर्ष
1. चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972) 1954
2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 ) 1954
3. डॉ. सी.व्ही. रमण (188-1970) 1954
4. डॉ. भगवान दास (1869 – 1958) 1954
5. डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 ) 1955
6. पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 ) 1955
7. पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 ) 1957
8. डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 ) 1958
9. डॉ. बी. सी. रॉय (1882 - 1962 ) 1961
10. पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 ) 1961
11. डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963) 1962
12. डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 ) 1963
13. डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 ) 1963
14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 ) 1966
15. इंदिरा गांधी (1817 - 1984 ) 1971
16. व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 ) 1975
17. के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 ) 1976
18. मदर टेरेसा (1910 - 1997 ) 1980
19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 ) 1983
20. खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 ) 1987
21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 ) 1988
22. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 ) 1990
23. डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 ) 1990
24. राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 ) 1991
25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 ) 1991
26. मोरारजी देसाई (1896 - 1995 ) 1991
27. मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958) 1992
28. जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 ) 1992
29. सत्यजीत रे (1922 - 1992 ) 1992
30. गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 ) 1997
31. श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 ) 1997
32. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931) 1997
33. श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 ) 1998
34. सी. सब्रमण्यम (1910 - 2000 ) 1998
35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 ) 1999
36. प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 ) 1999
37. लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 ) 1999
38. पंडीत रवी शंकर (1920 - 2012 ) 1999
39. लता मंगेशकर (जन्म 1929 ) 2001
40. उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 ) 2001
41. पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 ) 2009
42. प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 ) 2014
43. सचिन तेंडुलकर ( जन्म 1973 ) 2014
44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) (1861 - 1946) 2015
45. अटलबिहारी वाजपेयी ( जन्म 25 डिसेंबर 1924 ) 2015
संबंधित बातम्या
भारताचे अनमोल रत्न, हे आहेत आतापर्यंतचे 45 'भारतरत्न' !
राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या: खा. महाडिक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2018 03:58 PM (IST)
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -